Rishabh Pant: लढवय्या...! रिषभ पंतच्या अपघातानंतर पहिल्यांदाच गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया; कॅप्शननं जिंकली मनं

rishabh pant accident: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा मागील वर्षाच्या अखेरीस अपघात झाला होता.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा मागील वर्षाच्या अखेरीस अपघात झाला होता. अपघातानंतर सुरूवातीला उत्तराखंडमधील डेहराडून येथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर पंतवर मुंबईत उपचार सुरू होते. रिषभ पंत आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी घरी परतत असताना त्याच्या कारला अपघात झाला.

रिषभ पंत स्वतः कार चालवत होता आणि रुरकीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. लक्षणीय बाब म्हणजे पंतची रिकव्हरी जलद गतीने सुरू आहे, या अपघातानंतर त्याने अलीकडेच प्रथमच त्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने मन जिंकणारे कॅप्शन लिहले होते.

पंतला प्राथमिक उपचारांसाठी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पंतला त्यांच्या देखरेखीखाली मुंबईला आणण्यास सांगितले.

पंत जवळपास सहा महिने क्रिकेटपासून दूर असल्याचे मानले जात आहे. अशातच दोन फोटो शेअर करत पंतने लिहिले होते की, "एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत, एक पाऊल चांगले."

खरं तर रिषभ पंतने दोन फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये तो काठीचा आधार घेऊन चालत आहे. पंतच्या दोन्ही पायांना अद्याप प्लास्टर केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, तो इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार नसल्याचे सौरव गांगुली यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

मुंबईत दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर पंतला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पंत सध्या त्याच्या कुटुंबासह तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे. अलीकडेच त्याने क्रॅचच्या मदतीने चालतानाचे त्याचे फोटो शेअर केले होते.

त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीनेही रिषभ पंत क्रॅचच्या मदतीने चालण्याचा प्रयत्न करत असल्याच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.

अपघातातून सावरत असलेल्या रिषभ पंतला त्याची गर्लफ्रेंड ईशाने 'फायटर' अशी कमेंट केली. याशिवाय तिने लव्हच्या इमोजीद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.

ही पहिली वेळ नाही जेव्हा ईशा नेगीची पोस्ट अशा प्रकारे सार्वजनिकपणे समोर आली आहे. तिने अनेकवेळा रिषभ पंतबद्दल सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त केले आहे.

रिषभ पंतला लवकरच मैदानात परतायचे आहे. कार अपघातामुळे तो सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. देशांतर्गत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसोबतच, तो इंडियन प्रीमियर लीग आणि आयसीसी वन डे विश्वचषकातूनही बाहेर झाला असल्याचे समजते.