MS Dhoni Girlfriend : महेंद्रसिंग धोनीची पहिली गर्लफ्रेंड दिसायची अभिनेत्रींपेक्षा सुंदर, अपघातात झाले होते निधन! फोटो व्हायरल

MS Dhoni Girlfriend Priyanka Jha Photo Viral : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ( IPL 2023) चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद भूषविण्यासाठी सज्ज आहे. पण, आज धोनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

MS Dhoni Girlfriend Priyanka Jha Photo Viral : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ( IPL 2023) चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद भूषविण्यासाठी सज्ज आहे. CSK च्या सीईओंनी याबाबतच अपडेट्स नुकतेच दिले आहेत. सध्या धोनी पत्नी साक्षी व कन्या जीवा यांच्यासोबत सुट्टी एन्जॉय करतोय... पण, आज धोनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

धोनी आणि साक्षी यांनी ४ जुलै २०१० साली लग्न केलं. एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू उलगडून दाखवण्यात आला. त्यातूनच धोनी व साक्षी यांची भेट कशी झाली आणि त्यांचं प्रेम कसं फुललं हे दाखवले गेले.

याच चित्रपटातून MS Dhoniची प्रियांका झा ( Priyanka Jha) नावाची गर्लफ्रेंड होती हेही समोर आलं. एका अपघातात तिचा मृत्यू झाल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण, ती दिसायची कशी?

भारताचा माजी कर्णधार धोनीने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ( २००७), वन डे वर्ल्ड कप ( २०११) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ( २०१३) या आय़सीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनेही आयपीएलमध्ये ४ जेतेपदं नावावर केली आहेत.

महेंद्रसिंग धोनीने ९० कसोटींत ४८७६ धावा ( ६ शतकं व ३३ अर्धशतकं), ३५० वन डे सामन्यांत १०७७३ धावा ( १० शतकं व ७३ अर्धशतकं) आणि ९८ ट्वेंटी-२०त १६१७ धावा केल्या आहेत. त्याने यष्टिंमागे ८२९ बळी टिपले. त्यात ६३४ झेल व १९५ स्टम्पिंगचा समावेश आहे. शांत व संयमी धोनीने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. वडिलांचा विरोध झुगारून तो क्रिकेटपटू बनला...

एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून त्याचा प्रवास सर्वांनी पाहिला. पण, जवळच्या व्यक्ती वगळता धोनीच्या पहिल्या गर्लफ्रेंडची गोष्ट फार कुणाला माहित नव्हती, ती या चित्रपटातून सर्वांना समजली. दिशा पाटनीने या चित्रपटात ही भूमिका निभावली होती...

प्रियांका झा असे तिचे नाव होत आणि धोनी तिच्यासोबत लग्नही करणार होता. पण, अपघातात तिचे निधन झाले. अशात सोशल मीडियावर धोनी व प्रियांका यांचा फोटो व्हायरल झाला आहे. अनेकांनी ती मुलगी प्रियांकाच असल्याचा दावा केला आहे.

गुगल इमेज सर्चमध्ये जेव्हा हा फोटो अपलोड केला गेला, तेव्हा प्रियांका झा हिच असल्याचे समोर आले, पण नेमकं खरं काय हे धोनी व त्याचे निकटवर्तीयच सांगू शकतात..