Join us  

IPL Points Table : १ विजय अन् लखनौ टॉपवर! पराभवाने RCBची झाली घसरण; दिल्ली-मुंबई आज खातं उघडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 2:49 PM

Open in App
1 / 8

आयपीएल २०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्सने आपला चौथा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत खेळला. आरसीबीच्या घरात जाऊन विजय मिळवत लोकेश राहुलच्या लखनौने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून लखनौने यजमानांना पराभवाची धूळ चारली.

2 / 8

लखनौने आतापर्यंत स्पर्धेतील ४ मधील ३ सामने जिंकले आहेत. ३ विजयासह लखनौच्या खात्यात ६ गुण आहेत आणि +१.०८४चा नेट रनरेट आहे. तर काल झालेल्या पराभवानंतर २ गुण आणि -०.८०० च्या नेट रनरेटसह आरसीबीची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

3 / 8

आरसीबीच्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आला आहे. राजस्थानने आतापर्यंत ३ सामन्यातील २ सामने जिंकले आहेत. संजू सॅमसनच्या संघाच्या खात्यात ४ गुण असून +२.०६७ चा नेट रनरेट आहे. तर केकेआरचा संघ २ विजयासह ४ गुण आणि +१.३७५ च्या नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.

4 / 8

गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ २ विजयासह ४ गुण आणि +०.४३१ च्या नेट रनरेटमुळे चौथ्या तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ +०.३५६ नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर स्थित आहे.

5 / 8

याशिवाय अखेरच्या पाच क्रमांकावर पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आहेत. खरं तर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघाने अद्याप विजयाचे खाते देखील उघडले नाही.

6 / 8

आज मुंबई विरूद्ध दिल्लीचा सामना होणार आहे, त्यामुळे एक संघ विजयाचे खाते उघडेल हे स्पष्ट आहे. मुंबईला आपल्या पहिल्या सामन्यात आरसीबीकडून तर दुसऱ्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला.

7 / 8

ऑरेंज कॅपच्या यादीत पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन शिखरावर आहे. धवन २२५ धावांसह या यादीत अव्वल स्थानी आहे. तर १८९ धावांसह ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत फाफ डू प्लेसिस (१७५), विराट कोहली (१६४) आणि डेव्हिड वॉर्नर (१५८) धावांसह अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.

8 / 8

तर पर्पल कॅपच्या यादीत मार्क वुड अव्वल स्थानावर आहे. वुडने ९ बळी घेतले असून पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर राशिद खान ८ बळींसह दुसऱ्या, युजवेंद्र चहल ८ बळींसह तिसऱ्या, रवी बिश्नोई ६ बळींसह चौथ्या आणि अल्झारी जोसेफ ६ बळींसह पाचव्या स्थानावर आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३शिखर धवनलखनौ सुपर जायंट्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्स
Open in App