PHOTOS : भारतीय खेळाडूची नवी 'इनिंग'! टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजानं गुपचूप उरकलं लग्न

Navdeep Saini has married Swati Asthana : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला, ज्यामध्ये विजय मिळवून भारताने विजयी सलामी दिली.

भारताने १ चेंडू आणि २ गडी राखून पहिला सामना आपल्या नावावर केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना खूपच रोमांचक होता.

एकिकडे भारतीय संघ मायदेशात ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे, तर दुसरीकडे संघाचा स्टार गोलंदाज विवाहबंधनात अडकला. भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने लग्न केले असून त्याची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने शेअर केली आहे.

नवदीप सैनीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच खास कॅप्शनही लिहिले आहे.

"अस्थाना, तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस हा प्रेमाने भरलेला दिवस आहे. आज आम्ही कायमचे एकमेकांचे झालो आहोत. आम्ही आमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत", असे सैनीने लिहले.

नवदीपने स्वाती अस्थानासोबत सातफेरे घेतले. स्वातीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. पण रिपोर्ट्सनुसार, स्वाती एक फॅशन, ट्रॅव्हलर आणि लाइफस्टाइल ब्लॉगर आहे. तिचे यूट्यूब चॅनेल देखील आहे.

स्वातीने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. तिचे इंस्टाग्रामवर जवळपास ८० हजार फॉलोअर्स आहेत.

नवदीप सैनी मागील बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. सैनीने भारतासाठी २ कसोटी, ८ वन डे आणि ११ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

नवदीपने ३ ऑगस्ट २०१९ रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली अर्थात या सामन्यातून त्याने पदार्पण केले.