भारतीय गोलंदाजाचे मुंबईत आलिशान घर; जसप्रीत बुमराहचा 'राजेशाही थाट', पाहा Inside photo

jasprit bumrah luxury house pics : बुमराहचे घर हे जणू काही साधेपणा आणि सौंदर्याचे प्रतीकच.

भल्याभल्या फलंदाजांना चीतपट करणारा भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह... यॉर्कर किंग म्हणून सर्वदूर बुमराहची ख्याती आहे. आज आपण भारताच्या लाडक्या गोलंदाजाचे घर पाहणार आहोत.

बुमराहचे घर हे जणू काही साधेपणा आणि सौंदर्याचे प्रतीक असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याने त्याच्या संपूर्ण घराची रचना छान केली आहे. चला तर मग जाणून घेऊया बूम बूमच्या घराबद्दल.

जसप्रीत बुमराहचे कुटुंब अहमदाबादमध्ये स्थायिक असून बुमराह देखील तिथेच मोठा झाला. मध्यमवर्गीय कुटुंबातील बुमराहने आपल्या टॅलेंटच्या जोरावर क्रिकेट विश्वात गरूडझेप घेतली.

खरं तर बुमराहचे मुंबईत एक आलिशान घर असून, या घराची किंमत २ ते ३ कोटी रुपये असल्याचे कळते.

बुमराहने त्याच्या घराच्या बाल्कनीत अनेक फुलांची झाडे लावली आहेत, जी घराचे सौंदर्य वाढवतात.

फावल्या वेळात मनोरंजन व्हावं यासाठी बुमराहच्या घरात एक खास खोली देखील आहे, ज्यामध्ये तो मोकळ्या वेळात व्हिडीओ गेम खेळतो.

जसप्रीत बुमराहच्या घरातील भिंती आणि फर्निचर खूप सुंदर आहे.

अलीकडेच पार पडलेल्या वन डे विश्वचषकात बुमराहने प्रभावी कामगिरी केली. बुमराहला सर्वाधिक बळी घेता आले नसले तरी भारताच्या विजयांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. मात्र वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे, ज्यामध्ये बूम बूमचा देखील समावेश आहे.