CSK चा माजी क्रिकेटर आणि १९८३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य असलेल्या दिग्गज क्रिकेटरच्या मुलानं दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत नव्या इनिंगची सुरुवात केली आहे.
कृष्णमाचारी श्रीकांत यांचा मुलगा अनिरुद्ध श्रीकांत याने तमिळ अभिनेत्री आणि मॉडेल सम्युक्ता शनमुगनाथन हिच्यासोबत लग्न उरकले आहे.
अनिरुद्ध-सम्युक्ता यांनी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी हिंदू परंपरेनुसार, चेन्नईत मोजक्या मंडळींच्या साक्षीनं आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली.
दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातन लग्नाचे खास फोटो शेअर केले असून हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या जोडीच्या प्रेमाचा खेळ सुरु होता. प्रेमाचा लपंडाव सुरु असल्याची चर्चा रंगत असताना दोघांनीही मौन बाळगले. अखेर आता ही जोडीनं एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचे ठरवले आहे.
अभिनेत्री सम्युक्ता हिचे उद्योगपती कार्तिक शंकर याच्यासोबत पहिले लग्न झाले होते. २०२५ च्या सुरुवातीलाच तिचा घटस्फोट झाला. पतीचे अफेअर कळल्यामुळे लग्न मोडण्याचा निर्णय घेतल्याचे अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते. ही दाक्षिणात्य अभिनेत्री एका मुलाची आई देखील आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ही जोडी एकत्र दिसत होती. एकमेकांना समजून घेतल्यावर अखेर त्यांनी आयुष्याचा नवा अध्याय सुरु केला. अनिरुद्ध आणि सम्युक्ता दोघांचेही हे दुसरे लग्न आहे.
तमिळ सिनेसृष्टीतील ती एक लोकप्रिय चेहरा आहे. तमिळ बिग बॉस ४ मध्ये सहभागी झाल्यावर तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाल्याचेही पाहायल मिळाले होते.
अनिरुद्ध श्रीकांत याला भारतीय संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. २००८ ते २०१४ या कालावधीत तो चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळताना दिसला होता.