भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि अखेरचा वन डे सामना आज खेळवण्यात येणार आहे. भारताने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे आणि हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे विंडीज संघही मालिका बरोबरीत सोडवण्याच्या प्रयत्नात असेल.
ग्रीनफील्ड स्टेडियमवर एकच ट्वेंटी-20 सामना खेळवण्यात आला आहे. गतवर्षी झालेल्या या सामन्यात भारताने 6 धावांनी न्यूझीलंडला पराभूत केले होते.
कर्णधार विराट कोहलीला मायदेशात डे नाईट वन डे क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करण्यासाठी पाच धावांची आवश्यकता आहे.
भारताने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध 26 वन डे सामने जिंकला आहे, तर 27 सामन्यांत पराभव पत्करला आहे.
ग्रीनफील्ड स्टेडियम हे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यासाठीचे 30वे स्टेडियम आहे. या दोन संघांमध्ये सर्वाधिक सामने अहमदाबादच्या मोटेरो येथील सरदार पटेल स्टेडियमवर झाले आहेत.
भुवनेश्वर कुमारला वन डे क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण करण्यासाठी दोन बळींची गरज आहे. त्याने 94 सामन्यांत 38.50 च्या सरासरीने 98 विकेट घेतल्या आहेत. बळींचे शतक करणारा तो भारताचा 12 वा जलदगती गोलंदाज ठरणार आहे.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारताच्या जर्सीत वन डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी एक धाव हवी आहे.