रिषभ पंत : विश्वचषकात भारताकडून चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी रिषभ पंतला देण्यात आली होती. पण त्याला या क्रमांकाला न्याय देता आला नव्हता.
लोकेश राहुल : विश्वचषकात राहुलकडे चौथ्या क्रमांकाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे त्याला सलामीला जावे लागले होते.
श्रेयस अय्यर : भारतीय संघाला चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस हा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. या मालिकेत त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात येऊ शकते.
मनीष पांडे : मनीष हा चौथ्या क्रमांकासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. मनीषकडे चांगला अनुभव आहे. त्यामुळे या क्रमांकासाठी त्याला संधी मिळते का, हे पाहावे लागेल.