केमार रोचने टाकलेला इनस्विंग रोहितच्या बॅट अन् पॅडच्या मधून थेट यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. मैदानावरील पंचांनी यावर निकाल दिला नाही पण विंडीजनं तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली.
चेंडू बॅट अन् पॅडच्या मधून जाताना दिसत होता. पण, तो बॅटीला चाटून गेली की पॅडला याबाबत स्पष्टता नव्हती, तरीही तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद दिले आणि नेटिझन्सने टीकेची झोड उठवली.
हा सामना रोहितची पत्नी रितिकाही पाहत होती. रोहितला तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यावर रितिका चांगली भडकली होती.
या गोष्टीच्या रिप्लेमध्ये अल्ट्रा एज वापरण्यात आले होते. पण यामध्येही रोहित आऊट आहे किंवा नाही हे स्पष्ट होत नव्हते.
जेव्हा एखादी गोष्ट स्पष्ट होत नसते, तेव्हा बेनिफिट ऑफ डाऊट फलंदाजाला मिळत असतो. पण यावेळी मात्र तसे पाहायला मिळाले नाही.
तिसऱ्या पंचांनी जेव्हा रोहितला बाद दिले तेव्हा रोहितही नाखूष होता. त्याचबरोबर रितिकालाही हा निर्णय पटला नाही.
रोहितला बाद दिल्याच्या निर्णयाला चाहत्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.