India vs Pakistan: पाकिस्तान जिंकला तर फायनलमध्ये नक्की! भारताला मग दोन सामने...; आज रोहित, विराटला खेळावेच लागणार....

India vs Pakistan Live Update Marathi : आजची मॅच हरणे भारतासाठी पुढच्या दोन मॅच जिंकण्यापेक्षा जास्त कठीण जाणार आहे....

पहिला सामना पावसाने वाय घालवल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये आज दुसरा सामना होत आहे. गेल्यावेळप्रमाणे याही सामन्यावर पावसाचे सावट आहेच. यासाठीच आयसीसीने आज जर पाऊस पडला तर दुसरा दिवस राखीव ठेवला आहे. परंतू, जर पाऊस पडला नाही तर भारताला हा सामना काहीही करून जिंकावाच लागणार आहे. नाहीतर फायनलमध्ये जाण्यासाठी खूप झगडावे लागणार आहे.

टीम इंडियासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, त्यात पाकिस्तानी पेसर समोर आहेत. रोहित, विराट, गिल हे गेल्या सामन्यात कागदावरचेच घोडे ठरले होते. पाकिस्तान आज जिंकला तर थेट फायनलमध्ये जागा पक्की करणार आहे. भारताला आणखी दोन सामने खेळायचे आहेत. जिंकला तर या दोन सामन्यांवरील दडपण कमी होणार आहे. हरला तर हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावेच लागणार आहेत.

ग्रुप स्टेज संपल्यानंतर सुपर-4 टप्प्यात आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंकेने हा सामना 1-1 असा जिंकला. दोघांनी बांगलादेशचा पराभव केला. चांगल्या धावगतीमुळे पाकिस्तान 2 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे.

भारताने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. यामुळे आपण तिसऱ्या स्थानावर आहोत. 2 सामने गमावल्यानंतर बांगलादेशचे गुण मायनसमध्ये आहेत. आता बांगलादेशचा एक आणि भारताचे तीन सामने शिल्लक आहेत. तर श्रीलंका आणि पाकिस्तानचे २-२ सामने बाकी आहेत. यापैकीच एक सामना भारत पाकिस्तान आहे.

पाकिस्तानच्या संघाची स्थिती मजबूत आहे. जर आज भारताला हरवले तर त्यांची अंतिम फेरी गाठण्याची शक्यताही वाढणार आहे. श्रीलंकेविरुद्ध एक सामना शिल्लक आहे, तिथे पराभव पत्करावा लागला तरी पाकिस्तानची फायनलमधील शक्यता वाढलेलीच असणार आहे. फक्त त्यांना भारत-श्रीलंकेच्या सामन्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.

पाकिस्तानला पराभूत केल्यास भारतीय संघाचे 2 गुण होतील. जर विजय मोठ्या फरकाने मिळाला तर टीम इंडिया पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा चांगल्या धावगतीमुळे गुणतालिकेत पहिल्या स्थानावर देखील पोहोचू शकतो. पाकिस्तानविरुद्ध जिंकल्यास आणि श्रीलंका किंवा बांगलादेशविरुद्ध हरल्यास संघाचे ४ गुण होतील. यानंतर भारताला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यास भारतीय संघाला श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. तसेच पाकिस्तानला श्रीलंकेने हरविले तरच फायनलमध्ये जाण्याच्या आशा वाढतील. यानंतरच भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना पहायला मिळणार आहे.