Join us
Daily Top 2Weekly Top 5

मॅच असो की आंतरराष्ट्रीय दौरा, विराटसह सर्व क्रिकेटर स्वत:च्या खिशातून खाण्या-पिण्याचा खर्च करतात...; तुम्हाला काय वाटले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:09 IST

Open in App
1 / 10

नागपूर : विराट कोहलीसारखा स्टार खेळाडू सामना खेळून परतताना हॉटेलच्या काउंटरवर उभा राहून आपल्या खाण्या-पिण्याचे बिल भरत आहे, हा विचारच विचित्र वाटतो.

2 / 10

भारतीय क्रिकेटपटू जेव्हा सामने खेळायला जातात, तेव्हा ते हॉटेलमध्ये राजासारखे राहतात. त्यांना ना खाण्याची चिंता असते ना बिल भरण्याची. खिशातून एकही रुपया खर्च करण्याची त्यांना गरज पडत नाही, अशीच सर्वसाधारण धारणा क्रिकेट चाहत्यांची असते.

3 / 10

मात्र, 'लोकमत'च्या स्पोर्ट्स डेस्कने याचा आढावा घेतला असता, या झगमगाटामागचे एक वेगळेच वास्तव समोर आले आहे.

4 / 10

टीम इंडियाच्या व्यवस्थापनातील काही खात्रीलायक सूत्र, माजी खेळाडू आणि देशांतर्गत क्रिकेटशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे स्पष्ट झाले की, दौऱ्यादरम्यान हॉटेलमधील जेवण आणि अनेक खासगी खर्च खेळाडूंना स्वतःच्या खिशातून करावे लागतात.

5 / 10

यासाठी बीसीसीआय त्यांना निश्चित टीए-डीए म्हणजेच 'डेली अलाउन्स' देते, ज्यातून ते आपले जेवण आणि वैयक्तिक गरजांचा खर्च भागवतात. थोडक्यात सांगायचे तर, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आणि खर्च बीसीसीआय करते. (ज्यात केवळ नाश्ता समाविष्ट असतो) परंतु, इतर खर्चाची जबाबदारी खेळाडूंची असते.

6 / 10

₹६८०० प्रतिदिवस, भारतातील आंतरराष्ट्रीय सामने ₹११,५०० प्रतिदिवस, परदेश दौरा : सुमारे १२५ डॉलर (अंदाजे) ₹५००० प्रतिदिवस, आयपीएल खेळाडू ₹१००० ते २००० प्रतिदिवस, रणजी ट्रॉफी ₹५०० ते २००० प्रतिदिवस

7 / 10

हॉटेलमध्ये वास्तव्यादरम्यान खेळाडूंसाठी कोणतीही 'फ्री सिस्टम' नसते. प्रत्येक खेळाडूच्या नावावर खाण्यापिण्याचा हिशेब ठेवला जातो. खेळाडू चेकआउट करतात, तेव्हा त्यांना वैयक्तिक खर्चाचे पूर्ण बिल दिले जाते. ही प्रक्रिया सामान्य पाहुण्यांच्या गर्दीत होत नाही, तर खेळाडूंसाठी विशेष काउंटर, कलेक्शन डेस्क बनवला जातो.

8 / 10

हॉटेल पॅकेजव्यतिरिक्त जेवण कपडे धुण्याचा खर्च (लॉन्ड्री), चहा-कॉफी, स्नॅक्स स्थानिक प्रवास (वैयक्तिक वापरासाठी), फोन/इंटरनेट यांसारखे वैयक्तिक खर्च (टीप : हॉटेल, विमान प्रवास, टीम बस आणि मॅच फी बीसीसीआय वेगळी देते. यांचा समावेश या भत्त्यात नसतो.)

9 / 10

हा भत्ता दौऱ्याच्या सुरुवातीला किंवा मध्यभागी दिला जातो. तो रोख, बँक ट्रान्सफर किंवा कार्डद्वारे जमा केला जातो. अनेकदा तो आगाऊ स्वरूपातही दिला जातो.

10 / 10

सामान्य चाहत्यांना वाटते की क्रिकेटपटूंचे सर्व काही मोफत असते, परंतु शिस्तबद्ध आर्थिक नियोजनासाठी बीसीसीआय ही पद्धत वापरते. यामुळे खेळाडूंना त्यांच्या खर्चावर मर्यादा ठेवण्याची सवय लागते.

टॅग्स :बीसीसीआयविराट कोहलीरोहित शर्माअभिषेक शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंड