रोहितने आतापर्यंत या विश्वचषकात 320 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही रोहित काही विक्रम मोडीत काढू शकतो.
आतापर्यंत विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 2003 साली झालेल्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या. रोहितने आतापर्यंत या विश्वचषकात 320 धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहितला हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
सध्याच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 500 धावा फटकावल्या आहेत. पण वॉर्नर हा रोहितपेक्षा दोन सामने जास्त खेळला आहे.
आतापर्यंत एका विश्वचषकात सर्वाधिक शतके लगावण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर आहे. संगकाराने 2015च्या विश्वचषकात सर्वाधिक चार शतके झळकावली होती. रोहितने आतापर्यंत दोन शतके लगावली आहेत. त्यामुळे हा विक्रम मोडीत काढण्याची रोहितकडे संधी आहे.
विश्वचषकात सर्वात जास्त धावा न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तीलच्या नावावर आहे. गप्तीलने 2015च्या विश्वचषकात 237 धावा केल्या होत्या, रोहितला हा विक्रम मोडण्याचीही संधी आहे.