Join us

IND vs ENG, 4th Test : अक्षर पटेलचा पहिल्या षटकाचा करिष्मा, पूर्ण केली हॅटट्रिक; इंग्लंडला तीन धक्के

By स्वदेश घाणेकर | Updated: March 4, 2021 12:11 IST

Open in App
1 / 6

India vs England, 4th Test : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीचे पहिले सत्र टीम इंडियानं आपल्या नावावर केलं. अक्षर पटेल ( Axar Patel) यानं इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवलं. त्यानंतर मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं.

2 / 6

पण, ३ बाद ३० धावांवरून इंग्लंडचा डाव बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी सावरला आहे. अक्षर पटेलनं आजच्या सामन्यात आगळीवेगळी हॅटट्रिक पूर्ण केली. ( Axar Patel took wicket in his first over third time in series )

3 / 6

अक्षर पटेलनं पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. डॉम सिब्ली ( २) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पुढच्या षटकात अक्षरनं इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली ( ९) याला चूक करण्यास भाग पाडले आणि इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर १५ धावांवर माघारी परतले.

4 / 6

या मालिकेत त्यानं सलग तिसऱ्यांदा पहिल्या षटकात विकेट घेण्याचा पराक्रम करून आगळीवेगळी हॅटट्रिक नावावर केली. यापूर्वी तिसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांत अक्षरनं पहिल्याच षटकात विकेट घेतली होती. तेव्हा त्यानं पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोला पायचीत केलं होतं आणि दुसऱ्या डावात झॅकचा त्रिफळा उडवला होता.

5 / 6

अक्षर पटेलची कसोटी कारकिर्द आतापर्यंत दमदार राहिली आहे. त्यानं चेन्नईतील दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं आणि त्या सामन्यात सात विकेट्स ( २-४० व ५-६०) घेतल्या होत्या.

6 / 6

अहमदाबाद येथील डे नाईट कसोटीत त्यानं ११ विकेट्स ( ६-३८ व ५-३२) घेत इतिहास घडवला. दिवस-रात्र कसोटीत ११ विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्यानं पहिल्या दोन कसोटीत १८ विकेट्स घेतल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडअक्षर पटेल