Join us  

India vs England 4th test Live : विराट कोहली ठरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात विक्रमी फलंदाज, सचिनसह अनेकांना टाकले मागे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 5:22 PM

Open in App
1 / 9

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

2 / 9

लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी संयमी सुरुवात केली, परंतु आजच्या सामन्यातून इंग्लंडच्या ताफ्यात कमबॅक करणाऱ्या ख्रिस वोक्सनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला.

3 / 9

इंग्लंडच्या गोलंदाजांनी लयबद्ध गोलंदाजी करून सलग सहा षटकं निर्धाव टाकली. त्यामुळे दडपणात आलेल्या लोकेश राहुल ( KL Rahul) याचीही विकेट पडली. ऑली रॉबिन्सननं त्याला पायचीत केले. रोहित ११ व लोकेश १७ धावांवर बाद झाल्यानं टीम इंडियाची अवस्था २ बाद २८ अशी झाली.

4 / 9

विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची ११ धावांची भागीदारी जेम्स अँडरसननं तोडली. पुजारा ४ धावांवर माघारी परतला. पण, विराटनं पहिली धाव घेत मोठा पराक्रम केला.

5 / 9

भारताचा कर्णधार विराट कोहली याला मालिकेत काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्याच्या बॅटीतून एकच अर्धशतक आले आहे. पण, त्यानं ओव्हल कसोटीत मोठा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला चौथ्या कसोटीत फक्त १ धाव काढावी लागणार होती.

6 / 9

२००८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीनं कसोटीत ७६७१, वन डेत १२, १६९ व ट्वेंटी-२०त ३१५९ धावा केल्या आहेत. त्यानं आजच्या कसोटीत पहिली धाव घेताच मोठ्या विक्रमाची नोंद झाली.

7 / 9

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी ४९० डावांमध्ये २३ हजार धावा करणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या ( ५२२ डाव) नावावर होता. रिकी पाँटिंग ( ५४४) व जॅक कॅलिस ( ५५१) यांचा क्रमांक त्यानंतर येतो.

8 / 9

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार+ धावा करणारा तो जगातला सातवा फलंदाज आहे. सचिन, पाँटंग, कॅलिस, राहुल द्रविड, कुमार संगकारा व माहेला जयवर्षनं यांनी हा पराक्रम केला आहे. सचिनच्या नावावर ३४, ३५७, द्रविडच्या नावावर २४,२०८ धावा आहेत आणि त्यानंतर विराटचा क्रमांक येतो.

9 / 9

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीसचिन तेंडुलकरराहूल द्रविड
Open in App