Join us  

India vs Australia, 3rd Test : रोहित शर्मा-शुबमन गिल यांचा मोठा पराक्रम, १९६८ नंतर भारतीय सलामीवीरांचा ऑस्ट्रेलियात विक्रम!

By स्वदेश घाणेकर | Published: January 10, 2021 12:10 PM

Open in App
1 / 11

India vs Australia, 3rd Test Day 4 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजला ( Mohammed Siraj) वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला. तरीही या सर्व नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवून टीम इंडियानं ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सकारात्मक सुरुवात केली.

2 / 11

भारतीय क्षेत्ररक्षणांच्या गचाळ क्षेत्ररक्षणानं ऑस्ट्रेलियाला चार जीवदान दिले. त्याचाच फायदा उचलत ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित करून टीम इंडियासमोर ४०७ धावांचं तगडं आव्हान उभं केलं. मार्नस लाबुशेन ( ७३), स्टीव्हन स्मिथ ( ८१) आणि कॅमेरून ग्रीन ( ८४) यांनी दमदार खेळ केला.

3 / 11

रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुबमन गिल ( Shubman Gill) यांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावा जोडल्या. गिल ३१ धावांवर माघारी परतला. १३ वर्षांत प्रथमच भारताच्या सलामीच्या जोडीला आशिया खंडाबाहेर कसोटीच्या चौथ्या डावात १५ हून अधिक षटक खेळण्यात यश आलं.

4 / 11

२०१०नंतर एकाच कसोटीत दोन्ही डावात टीम इंडियाच्या सलामीवीरांना ५०+ भागीदारी करता आली. यापूर्वी २०१८मध्ये लोकेश राहुल व शिखर धवन यांनी ( ६० व ६०) ट्रेंट ब्रिज कसोटीत ही कामगिरी केली होती.

5 / 11

२०१५नंतर रोहितनं आशिया खंडाबाहेर प्रथमच दोन्ही डावांत २०+ धावा केल्या. यापूर्वी २०१५मध्ये सिडनीतच रोहितनं ७९ व ३४ धावा केल्या होत्या.

6 / 11

परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यातील दोन्ही डावांत ५०+ भागीदारी करणारी रोहित व शुबमन ही पाचवी भारतीय जोडी आहे. २००६नंतर प्रथमच भारतीय खेळाडूंना हे करता आलं.

7 / 11

१९६८नंतर भारतीय सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियात एकाच कसोटीत दोन्ही डावांत ५०+ भागीदारी केली आहे. यापूर्वी अबील अली व फारुख इंजिनियर्य यांनी सिडनीवरच ही कामगीरी केली होती. १९९६मध्ये श्रीलंकेच्या सी हाथुरूसिंगा व सनथ जयसुर्या यांनी अॅडलेड कसोटीत अशी कामगिरी केली होती.

8 / 11

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक ५० षटकार मारण्याचा विक्रमही रोहित शर्मानं नावावर केला. व्हीव्ह रिचर्ड्स यांनी ४५, ख्रिस गेल ३५ आणि शाहिद आफ्रिदी यांनी ३२ षटकार खेचले आहेत.

9 / 11

२००६नंतर भारताच्या सलामीवीरांनी प्रथमच परदेशात चौथ्या डावात ५०+ भागीदारी केली. २००६मध्ये वासीम जाफर व वीरेंद्र सेहवाग यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध १०९ धावांची भागीदारी केली होती.

10 / 11

11 / 11

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रोहितनं प्रथमच चौथ्या डावात अर्धशतक झळकावलं.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माशुभमन गिल