Join us  

ऋतुराज गायकवाडने कुटल्या ३६ चेंडूंत १०२ धावा; ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाडला विक्रमांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 9:08 PM

Open in App
1 / 5

२४ धावांवर २ फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवसह ऋतुराजने डाव सावरला. त्यानंतर तिलक वर्मासोबत १४१ धावांची भागीदारी करून टीम इंडियाला २ बाद २२२ धावांपर्यंत पोहोचवले.

2 / 5

सूर्यकुमार यादव २९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारासह ३९ धावांवर झेलबाद झाला आणि ऋतुराजसह त्याची ५७ ( ४७ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. त्यानंतर ऋतुराजने जबरदस्त फटकेबाजी केली. ऋतुराजने षटकाराने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पहिले शतक पूर्ण केले. ऋतुराज ५७ चेंडूंत १३ चौकार व ७ षटकारांसह १२३ धावांवर नाबाद राहिला. तिलकने नाबाद ३१ धावा करताना ऋतुराजसह ५९ चेंडूंत १४१ धावांची भागीदारी केली.

3 / 5

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो नववा फलंदाज ठरला. रोहित शर्मा ( ४), सूर्यकुमार यादव ( ३) व लोकेश राहुल ( २) यांनी एकापेक्षा अधिक शतक झळकावली आहेत. सुरेश रैना, विराट कोहली, दीपक हुडा, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल व ऋतुराज यांच्या नावावर एक शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरला.

4 / 5

ऋतुराजने नाबाद १२३ धावा केल्या आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील ही भारताकडून दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली. शुबमन गिलने २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नाबाद १२६ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने २०२१ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध १२२ धावा केल्या होत्या.

5 / 5

गायकवाडने आज पहिल्या २१ चेंडूंत २१ धावा केल्या होत्या, त्यानंतर पुढील ३४ चेंडूंत त्याने १०१ धावांची खेळी केली. शेवटच्या ३ षटकांत ऋतुराजने ५२ धावा कुटल्या. युवराजने २००७मध्ये शेवटच्या १४ चेंडूंत ५४ धावा कुटल्या होत्या. ऋतुराजने आज विराटचा ( ४५ धावा वि. अफगाणिस्तान) विक्रम मोडला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऋतुराज गायकवाडविराट कोहलीयुवराज सिंग