Join us  

India vs Australia : अरे आवाज कुणाचा.... टीम इंडियानं जग जिंकलं; कोणत्याच संघाला जमला नाही हा भीमपराक्रम

By स्वदेश घाणेकर | Published: December 06, 2020 5:54 PM

Open in App
1 / 13

India vs Australia, 2nd T20I: भारतीय संघानं वन डे मालिकेतील पराभवाचा वचपा ट्वेंटी-20 मालिकेत काढलाच.. हार्दिक पांड्यानं ( Hardik Pandya) पुन्हा एकदा मॅच विनिंग खेळी करताना टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सुकर बनवला.

2 / 13

ऑस्ट्रेलियाच्या १९४ धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल व शिखर धवन यांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर विराट कोहली व हार्दिकच्या फटकेबाजीनं सामनाच फिरवला.

3 / 13

भारतानं सहा विकेट्स राखून विजय मिळवताना तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिका विजयासह भारतानं आतापर्यंत कोणत्याच संघाला न जमलेला भीमपराक्रम केला.

4 / 13

फिंचच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी मिळालेल्या मॅथ्यू वेडनं चांगली पार पाडली. वेडनं ३२ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ५८ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं १३ चेंडूंत २ षटकारांसह २२ धावा केल्या. मोइजेस हेन्रीक्स याच्यासह स्मिथनं ४७ धावा जोडल्या.

5 / 13

स्मिथ ३८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ४६ धावांवर युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. हेन्रीक्सही 18 चेंडूंत 26 धावा करून टी नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. नटराजननं 19 धावांत 2 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियानं 5 बाद 194 धावा केल्या.

6 / 13

प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सहाव्या षटकात अँड्य्रू टायनं भारताला धक्का दिला. राहुल २२ चेंडूंत २ चौकार व १ षटकार मारून ३० धावांवर झेलबाद झाला.

7 / 13

अॅडम झम्पानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार मारून ५२ धावा करणाऱ्या धवनला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. विजयासाठी ४६ धावांची गरज असताना डॅनिएल सॅम्सनं ऑसींना मोठी विकेट मिळवून दिली.

8 / 13

विराट २४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह ४० धावांत माघारी परतला. हार्दिक व श्रेयस अय्यरनं अखेरच्या षटकात फटकेबाजी करून सामन्यासह मालिकाही खिशात घातली. हार्दिक २२ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर, तर अय्यर ५ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

9 / 13

सलग १० ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. या कामगिरीसह टीम इंडियानं सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकले होते.

10 / 13

टीम इंडियाने गेल्या वर्षी डिसेंबरपासून एकही टी-२० लढत गमावलेली नाही. सलग सर्वाधिक ट्वेंटी-२० लढती जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी २०१८ ते २०१९ या कालावधीत १२ लढती जिंकल्या. यापूर्वी त्यांनी २०१६ ते २०१७ या काळात सलग ११ सामन्यात विजय मिळवला होता.

11 / 13

भारताचा हा सलग सहावा ट्वेंटी-20 मालिका विजय आहे. पाच वेगवेगळ्या देशांना सलग ट्वेंटी-20 मालिकेत पराभूत करणारा भारत हा पहिलाच देश आहे.

12 / 13

शिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार आहे.

13 / 13

भारताची मागील सात ट्वेंटी-२० मालिकेतील अपराजीत कामगिरी - वेस्ट इंडिज ( वि. ३-०), दक्षिण आफ्रिका ( बरोबरीत १-१), बांगलादेश ( वि. २-१), वेस्ट इंडिज ( वि. २-१), श्रीलंका ( वि. २-०), न्यूझीलंड ( वि. ५-०), ऑस्ट्रेलिया ( वि. २-०).

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघहार्दिक पांड्याविराट कोहलीलोकेश राहुलशिखर धवन