Join us

India vs Pakistan कसोटी मालिकेबाबत रोहित शर्माचं मोठं विधान; निर्माण होऊ शकतो नवा वाद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 16:36 IST

Open in App
1 / 6

ॲडम गिलख्रिस्ट आणि मायकेल वॉन यांनी सह-होस्ट केलेल्या क्लब प्रेरी फायर पॉडकास्टवर गप्पा मारताना , रोहित म्हणाला की त्याला भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियमितपणे द्विपक्षीय क्रिकेट खेळण्यास आवडेल. पाकिस्तानचा संघ मिसबाह-उल हकच्या नेतृत्वाखाली २०१२-१३ मध्ये शेवटचा भारतात तीन सामन्यांची वन डे मालिका खेळण्यासाठी आला होता.

2 / 6

कसोटी क्रिकेटच्या आरोग्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये परदेशात मालिका होणे फायदेशीर ठरेल का, या मायकेल वॉनच्या प्रश्नावर रोहित म्हणाला, 'मला पूर्ण विश्वास आहे.'' २००७ मध्ये पाकिस्तानने भारताचा दौरा केला तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानने कसोटी आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटचा समावेश असलेली संपूर्ण द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही.

3 / 6

रोहित म्हणाला की, पाकिस्तान हा चांगला कसोटी संघ आहे, ज्यांच्याकडे मजबूत गोलंदाजीचा युनिट आहे. ज्यांचा सामना करण्यासाठी भारत उत्सुक असेल. 'तो एक चांगला संघ आहे. त्यांच्याकडे उत्कृष्ट गोलंदाजी लाइनअप आहे. त्यामुळे ही एक चांगली स्पर्धा असेल, खासकरून जर तुम्ही परदेशात खेळलात तर. ते खूप छान असेल,' असे रोहित म्हणाला.

4 / 6

श्रीलंका, बांगलादेश आणि UAE सारख्या शेजारील देशांमध्ये द्विपक्षीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी दोन्ही बोर्डांकडून अनेक प्रयत्न केले आहेत. अलिकडेच इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील, IND vs PAK मालिका आयोजित करण्यात आपले स्वारस्य जाहीरपणे व्यक्त केले होते.

5 / 6

भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिकेवर स्पष्ट भूमिका व्यक्त करणारा रोहित हा भारतीय क्रिकेटमधील कदाचित पहिलाच मोठा खेळाडू असेल. भारताचा कसोटी कर्णधार या नात्याने तो आयसीसी टूर्नामेंटच्या व्यतिरिक्त पाकिस्तानविरुद्ध नियमितपणे खेळू इच्छितो का, या वॉनच्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित म्हणाला, 'होय, मला आवडेल.'

6 / 6

'दिवसाच्या शेवटी, आम्हाला स्पर्धेत उतरायचे आहे आणि मला वाटते की दोन्ही बाजूंमधील ही एक चांगली स्पर्धा असेल. आम्ही आयसीसी ट्रॉफीमध्ये खेळतो, त्यामुळे काही फरक पडत नाही. हे फक्त शुद्ध क्रिकेट आहे, मला इतर कशातही रस नाही, तो बॅट आणि बॉलमधील खेळ आहे,''असेही रोहितने स्पष्ट केले.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माबीसीसीआय