भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे मालिकेत या 8 खेळाडूंच्या कामगिरीकडे असतील सर्वांच्या नजरा

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. धावांचा पाठलाग करण्यात विराटचा हात कोणी धरु शकत नाही. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 50 पेक्षा जास्त सरासरी असणारा जगातील एकमेव फलंदाज.

मोहम्मद शमीनं 70 वन-डेमध्ये 91 बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बाद करण्यात माहिर. पावरप्ले आणि डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्याबरोबरच फलंदाजांना माघारी परतवण्यात पटाईत.

भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा म्हणजे हार्दिक पांड्या. शेवटच्या षटकांत घाणाघाती फलंदाजी करण्यात माहिर. जलगती गोलंदाजीही करु शकतो.

सलामीवीर रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरोधातील रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यानं सातत्यानं धावा काढल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात त्यांन द्विशतकी खेळीही केली आहे.

डेव्हिड वॉर्नरला लवकर बाद करणं भारतीय संघासाठी फायद्याचे आहे. कारण 20 षटके जरी खेळला तरी सामन्याचा निकाल बदलवू शकतो.

जगातील अव्वल पाच फंलदाजमधील एक म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ. भारताविरोधात खोऱ्यानं धावा काढण्याचा इतिहास.

मधल्या फळीतील विस्फोट फलंदाज म्हणून ग्लेन मॅक्सवेलला ओळखलं जातं. एकहाती सामना फिरवण्याची क्षमता. गोलंदाजीतही कमाल करु शकतो.

मार्कस स्टोइनिसनं सराव सामन्यात 76 धावांची वादळी अर्धशतकी खेळी करुन भारतीय गोलंदाजांना एकप्रकारे सावध राहण्याचा इशाराच दिला आहे.