IND vs WI: दुसऱ्या T20 साठी 'टीम इंडिया'मध्ये हार्दिक २ मोठे बदल करण्याची शक्यता

IND vs WI 2nd T20: विंडिज विरूद्धचा आज (रविवारी) दुसरा टी२० सामना

IND vs WI 2nd T20 Team India changes in Playing XI: वेस्ट इंडिजविरूद्ध वन डे मालिकेत २-१ ने विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाची टी२० मालिकेची सुरूवात पराभवाने झाली. भारतीय संघाने पहिला टी२० सामना अतिशय कमी फरकाने गमावला.

विंडिजच्या फलंदाजांनी प्रथम दमदार कामगिरी करत १४९ धावा केल्या. या सामन्यात त्यांच्याकडून कर्णधार रोव्हमन पॉवेलने ४८ तर निकोलस पूरनने ४१ धावा कुटल्या.

प्रत्युत्तरात भारताच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. केवळ पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या तिलक वर्माला २२ चेंडूत ३९ धावांची खेळी करता आली.

आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी२० सामना आहे. हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची टीम इंडियाला संधी आहे. यासाठी हार्दिकला संघात दोन बदल करण्याची शक्यता आहे.

यशस्वी जैस्वालला दुसऱ्या सामन्यात अक्षर पटेलच्या जागी संधी मिळू शकते. जैस्वालने नुकतीच कसोटीत आपली प्रतिभा दाखवली आहे. त्यामुळे ५ गोलंदाज संघात असताना अक्षरच्या जागी अतिरिक्त फलंदाज म्हणून जैस्वालचा विचार केला जाऊ शकतो.

गोलंदाजीची धार अधिक तीव्र करण्यासाठी आवेश खानचा संघात समावेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवेश अनुभवी आहे, त्यामुळे त्याला मुकेश कुमारच्या जागी संघात स्थान देण्यात आले तर टीम इंडियाची गोलंदाजी अधिक धारदार होऊ शकेल.