Join us

नवरोबानं सेंच्युरी मारल्यावर शिट्टी वाजवली; बायकोनं प्रेम दाखवत ती खास 'फ्रेम' केली व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:26 IST

Open in App
1 / 8

वेस्ट इंडिज विरुद्धच्या अहमदाबाद कसोटी सामन्यात पहिल्या डावात सलामीवीर लोकेश राहुलच्या भात्यातून संयमी शतकी खेळी पाहायला मिळाली.

2 / 8

कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक लोकेश राहुलसाठी एकदम खास होते. कारण घरच्या मैदानता २०१६ नंतर त्याने झळकावलेले हे दुसरे शतक आहे.

3 / 8

घरच्या मैदानात ३२११ दिवसांनी आलेल्या शतकाचा आनंद लोकेश राहुलनं भर मैदानात शिट्टी मारून व्यक्त केला.

4 / 8

सलामीवीराच्या रुपात रोहित शर्माची जागा घेतल्यापासून लोकेश राहुल सातत्याने दमदार कामगिरी करतोय. इंग्लंड दौऱ्यात खास छाप सोडल्यावर आता घरच्या मैदानातही त्याने दमदार कामगिरी करुन दाखवलीये.

5 / 8

वेस्ट इंडिज विरुद्धच्या खास खेळीनंतर केलेल्या शतकी सेलिब्रेशनवर त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीनं दिलेली रिअ‍ॅक्शनही लक्षवेधी ठरतीये. कामगिरीशिवाय शतकी सेलिब्रेशनवर त्याची पत्नी आणि बॉलिबूड अभिनेत्री अथिया शेट्टीनं दिलेली इन्स्टा स्टोरीवरील पोस्टही चर्चेत आलीये.

6 / 8

अथिया शेट्टी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असल्याचे दिसून येते. नवरोबावर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी ती चुकवत नाही.

7 / 8

KL राहुल सेंच्युरी ठोकल्यावर शिट्टी वाजवली, अन् अथियानं त्याच्यावर पुन्हा एकदा प्रेम व्यक्त करताना ती खास 'फ्रेम' इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून व्हायरल केली.

8 / 8

अथिया शेट्टी आणि केएल राहुल काही महिन्यांपूर्वीच आई बाबा झाले. घरी नन्ही परी आल्यापासून लोकेश राहुलच्या कामगिरीचा आलेख कमालीचा उंचावला आहे.

टॅग्स :लोकेश राहुलअथिया शेट्टी भारत विरुद्ध वेस्ट इंडिजऑफ द फिल्ड