Join us  

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; ५००व्या डावात रचला पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 5:54 PM

Open in App
1 / 5

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत व विराट कोहली ( Rishabh Pant and Virat Kohli) या जोडीनं टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत कमबॅक मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या ११ चेंडूंत चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीला माघारी पाठवून मोठं यश मिळवलं होतं. पण, रिषभच्या आक्रमक फटकेबाजीनं त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवलं.

2 / 5

भारताची दुसऱ्या डावातही सुरुवात निराशाजनक झाली. लोकेश राहुल ( १०), मयांक अग्रवाल ( ७), चेतेश्वर पुजारा ( ९) आणि अजिंक्य रहाणे ( १) हे माघारी परतल्यानं भारताची अवस्था ४ बाद ५८ अशी झाली होती. पण, रिषभ व विराटनं टीम इंडियाचा डाव सावरला.

3 / 5

रिषभ मागून येऊन अर्धशतक पूर्ण केले आणि विराटनं दुसऱ्या बाजूनं संयमी खेळ करून त्याला साथ दिली. पण, लंच ब्रेकनंतर भारताला पाचवा धक्का बसला. १४३ चेंडूंत २९ धावा करणारा विराट कोहली परतला माघारी परतला अन् रिषभ पंतसोबतची ९४ धावांची भागीदारी संपुष्टात आली.

4 / 5

दक्षिण आफ्रिकेत कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताच्या ५ किंवा त्या खालील क्रमांकावरील विकेटसाठी नोंदवलेली ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. या भागीदारीत महेंद्रसिंग धोनी व सचिन तेंडुलकर यांची १७२ ( २०१०, सेंच्युरियन) धावांची भागीदारी अव्वल क्रमांकावर आहे. कपिल देव व अनिल कुंबळे यांनी १९९२ मध्ये ७७ धावांची भागीदारी केली होती.

5 / 5

विराट कोहलीचा हा ५००वा आंतरराष्ट्रीय डाव होता आणि कारकीर्दित ५००व्या डावानंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम विराटच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यानं ५०० आंतरराष्ट्रीय डावांमध्ये २३,३५८ धावा करताना सचिन तेंडुलकरचा २२,२१४ धावांचा विक्रम मोडला. विराटनं १ ते २५० डावांमध्ये १०,४९६ आणि २५१ ते ५०० डावांमध्ये १२,८६२ धावा केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारिषभ पंतविराट कोहलीसचिन तेंडुलकर
Open in App