Join us  

Rishabh Pant, IND vs SA 2nd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेची ३ बाद २९ अशी अवस्था करूनही टीम इंडिया कशी हरली?; रिषभ पंतकडून चूक झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 10:50 PM

Open in App
1 / 7

India vs South Africa 2nd T20I Live Updates : भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातही दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेने १४९ धावांचे लक्ष्य १८.२ षटकांत ६ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. भुवनेश्वर कुमारने पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स घेऊन आफ्रिकेची अवस्था ३ बाद २९ अशी केली होती. तरीही आफ्रिकेने हा विजय खेचून आणला.

2 / 7

गोलंदाजांसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीचा आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला. इशान किशन ( ३४) , श्रेयस अय्यर ( ४०) आणि दिनेश कार्तिक ( ३०*) हे तिघे वगळल्यास भारतीय फलंदाज आज अपयशी ठरले. रिषभ पंत चुकीचा फटका मारून बाद झाला, तर हार्दिक पांड्याचा भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडाला. कार्तिकने अखेरच्या ५ चेंडूंत २१ धावा केल्या म्हणून भारताने ६ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारली.

3 / 7

प्रत्युत्तरात आफ्रिकेची सुरुवात भारतापेक्षा खराब झाली. त्यांचे तीन फलंदाज २९ धावांत माघारी परतले. कर्णधार रिषभ पंतने पॉवर प्लेमध्ये अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडून ३ षटकं टाकून घेतली आणि त्याने त्याचा विश्वास सार्थ ठरवला. पण, पुढील १४ षटकांचे नियोजन करण्यात रिषभ चुकला.

4 / 7

युजवेंद्र चहलची धुलाई होत असूनही त्याच्याकडून चार षटकं टाकून घेतली. चहलने ४९ धावा देत १ विकेट मिळवली. मागील सामन्यात चहलला २ षटकंच दिल्याने रिषभवर टीका झाली होती आणि त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न रिषभ करताना दिसला. पण, खेळपट्टीनुसार निर्णय घेण्यात तो चूकला.

5 / 7

हार्दिक पांड्या, आवेश खान व हर्षल पटेल यांच्या प्रत्येकी ४ अशा १२ षटकांचं नियोजन योग्य रितेने झाले असते तर कदाचीत ही लढत अधिक चुरशीची झाली असती अन् भारताला बरोबरीची संधी मिळाली असती. हर्षलने ३ षटकांत १७ धावांत १ विकेट घेतली. आवेशने ३ षटकांत १७ धावा दिल्या. हार्दिक महागडा ठरला आणि त्याने ३ षटकांत ३१ धावा दिल्या.

6 / 7

फिल्ड प्लेसमेंटमध्येही आज घपलत झालेली पाहायला मिळाली. मालिकेतील पहिलाच सामना खेळणाऱ्या हेनरीक क्लासेनवर दडपण निर्माण करता आले असते, परंतु क्लासेनला मुक्तपणे फटकेबाजी करण्याची संधी रिषभने दिली. त्याच्या फटकेबाजीनुसार रिषभ फिल्ड प्लेसमेंट बदलताना दिसला अन् क्लासेनने त्याचा फायदा पुरेपूर उचलला.

7 / 7

क्लासेन ४६ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांत माघारी परतला. त्याने चौकार-षटकारांनी १२ चेंडूंत ५८ धावा चोपल्या. भुवीने आणखी एक विकेट घेताना ड्वेन पार्नेलचा ( १) त्रिफळा उडवला. भुवीने १३ धावांत ४ विकेट्स घेतल्या. आफ्रिकेने १८.२ षटकांत ६ बाद १४९ धावा करून विजय पक्का केला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारिषभ पंतभुवनेश्वर कुमार
Open in App