Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी तरुणीला बाबर आझम नाही तर आपला विराट आवडतो; जाणून घ्या कोण आहे ती तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 16:10 IST

Open in App
1 / 9

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अनेक महिन्यानंतर होतं आहे, अनेक चाहत्यांनी या सामन्यासाठी गर्दी केली असून कालच्या सामन्यात एका पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक पाकिस्तानी तरुणी भारतीय फलंदाज विराट कोहलीचं कौतुक करत असल्याचे दिसत आहे.

2 / 9

आशिया चषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात विराट कोहली फक्त ४ धावा करून बाद झाला. यावेळी लाखो चाहते नाराज झाले. त्यापैकी एक पाकिस्तानी फॅन तरुणीही नाराज झाली.

3 / 9

यानंतर पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर कॅमेऱ्यासमोर आलेल्या एका पाकिस्तानी तरुणीने कोहलीवर आपले प्रेम तर व्यक्त केले. आज या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, चला जाणून घेऊया ही तरुणी आहे कोण?

4 / 9

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर भारत आणि पाकिस्तानच्या सर्व क्रिकेट चाहत्यांनी ही तरुणी पाकिस्तानची असल्याचा दावा केला आहे. ती सध्या UAE मध्ये राहते.

5 / 9

एका वृत्तानुसार, या व्हायरल व्हिडीओतील तरुणीचे नाव लव खानी आहे. ती सोशल मीडिया स्टार आहे.

6 / 9

पाकिस्तानचे फॅन्सने पहिल्यांदाच भारतीय खेळाडुचे कौतुक केले आहे. सध्या तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काल जेव्हा तरुणी क्रिकेट मॅच पाहायला आली तेव्हा तिच्या गालावर भारत आणि पाकिस्तानच्या फ्लगची चिन्ह होती.

7 / 9

लव हिच्या अनेक रील आणि टिकटॉक पोस्टमध्ये भारतीय गाणी आहेत. ती स्टेडियममधून रील बनवते.

8 / 9

लव सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिच्या बहुतेक पोस्ट विराट कोहलीबद्दल असतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापासून ते खेळापर्यंत तिने रील तयार केले आहेत.

9 / 9

कालच्या सामन्यात विराट कोहली लवकर आऊट झाल्याबद्दल लवने निराशा व्यक्त केली. लव म्हणाली, मी फक्त विराटला भेटायला आले होते. मला त्याचे शतक बघायचे होते, पण तो लवकर बाद झाला. मला तो खूप आवडतो. यावर बाबर आणि कोहली यांच्यामध्ये ती कोणाची निवड करणार, असे विचारले असता ती कोहलीचे नाव घेतले.

टॅग्स :ऑफ द फिल्डविराट कोहलीपाकिस्तान
Open in App