Join us  

IND vs PAK: "म्हणूनच दिनेश कार्तिकला संघात घेतलं अन् पंतला बाहेर ठेवलं"; हरभजन सिंगचे रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 7:05 PM

Open in App
1 / 6

Harbhajan Singh on Rishabh Pant: आशिया चषक २०२२ च्या (Asia Cup 2022) सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा (IND vs PAK) ५ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने भारताला २० षटकात १४८ धावांचे माफक आव्हान दिले होते. पण ते आव्हान गाठण्यासाठी भारतीय संघाला २०वे षटक गाठावे लागले. अखेर शेवटच्या षटकात निर्णायक षटकार खेचत हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

2 / 6

या सामन्यात संघात विकेटकिपर फलंदाज म्हणून पहिली पसंती दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) देण्यात आली होती. नवख्या रिषभ पंतला संघाबाहेर बसवण्याचा हा निर्णय काहीस कठीण होता, मात्र याच दरम्यान भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने पंतबद्दल एक विधान केले.

3 / 6

पाकिस्तान सारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यासमोर रिषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्याच्या कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) निर्णयाचे हरभजन सिंगने समर्थन केले. त्याच वेळी रिषभ पंत बद्दल त्याने एक विधान केले. हरभजन सिंगचे हे शब्द ऐकून कदाचित रिषभ पंतलाही ते विधान चांगलेच झोंबेल.

4 / 6

'दिनेश कार्तिक सध्या टी२० फॉरमॅटमध्ये फॉर्मात आहे. टीम इंडियाने त्याचा फायदा करून घेतलाच पाहिजे. ऋषभ पंत अजूनही खूप तरुण आहे आणि तो बरीच वर्षे क्रिकेट खेळू शकतो, पण दिनेश कार्तिककडे फक्त एक-दोन वर्षे उरली आहेत. अशा परिस्थितीत रिषभ पंतला न खेळवता त्याजागी दिनेश कार्तिकला संधी देणे ही टीम इंडियाची योग्य खेळी आहे', असे भज्जी म्हणाला.

5 / 6

हरभजन सिंगच्या म्हणण्यानुसार, रिषभ पंत हा टी२० क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिकइतका प्रभावी क्रिकेटपटू नाही. म्हणूनच आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार रोहित शर्माने पंतचा समावेश न करता त्याऐवजी दिनेश कार्तिकचा समावेश केला.

6 / 6

'ऋषभ पंतने गेल्या काही वर्षांत चमकदार कामगिरी केली आहे. विशेषत: कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. पण टी२० क्रिकेटमध्ये मात्र तो दिनेश कार्तिकसारखा प्रभावी खेळाडू म्हणून अद्याप तरी उदयास आलेला नाही. दिनेश कार्तिकच्या फलंदाजीत सुधारणा झाली आहे हे नाकारता येणार नाही. अशा वेळी रिषभ पेक्षा कार्तिकला संधी मिळणे स्वाभाविकच आहे', असे रोखठोक विधान त्याने केले.

टॅग्स :एशिया कप 2022हरभजन सिंगरिषभ पंतदिनेश कार्तिक
Open in App