शुबमन गिल ७९ रन्सवर झाला रिटायर्ड हर्ट; मैदानात पुन्हा बॅटिंगला येऊ शकतो? वाचा नियम

वर्ल्ड कप २०२३ च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरोधात शुबमन गिल ७९ रन्स बनवून रिटायर्ड हर्ट झाला. मुंबईच्या रखरखत्या उन्हात बँटिंग करताना त्याला आलेल्या क्रॅम्पमुळे गिल मैदान सोडून पुन्हा पव्हेलियनला माघारी परतला.

फिजियोकडून उपचार घेऊनही गिलला बरे वाटले नाही तेव्हा कॅप्टन रोहित शर्माने इशारा करून गिलला परत बोलावले. भारताला हा झटका अशावेळी लागला जेव्हा २३ व्या ओव्हरमध्ये भारताने एक विकेटच्या गमावून १६४ रन्स केल्या होत्या.

जेव्हा गिल बाहेर गेला तेव्हा त्याच्या नावासमोर रिटायर्ड(Retired Hurt) हर्ट लिहिले होते. याचा अर्थ तो पुन्हा येऊ शकतो. जर त्याच्या नावासमोर रिटायर्ड आऊट(Retired Out) लिहिलं असते तर त्याचा खेळ तिथेच संपला असता. नेमका या दोघांमध्ये काय फरक आहे हे जाणून घेऊ.

काय आहे रिटायर्ड हर्ट? सामान्यत: जेव्हा एखादा फलंदाज पळू शकत नाही किंवा त्याला अशा वेदना येतात जे तो सहन करू शकत नाही तेव्हा त्याला थांबवून ड्रेसिंग रुममध्ये बोलावले जाते. त्याला रिटायर्ड हर्ट असं म्हटलं जाते.

याआधी जखमी फलंदाजाला रनर मिळत होता. परंतु आता हा नियम बदलला आहे. जेव्हा फलंदाज रिटायर्ड हर्ट होतो, त्यानंतर त्याला जेव्हा बरे वाटेल तो पुन्हा मैदानात परतू शकतो. परंतु तोपर्यंत स्कोअर बोर्डवर फलंदाजाच्या नावापुढे रिटायर्ड हर्ट लिहिले जाते.

काय आहे रिटायर्ड आऊट? जेव्हा फलंदाज स्वत: अथवा त्याच्या कॅप्टनकडून आऊट करण्याचा निर्णय घेतला जातो. तेव्हा क्रिकेटमध्ये त्याला रिटायर्ड आऊट म्हटलं जाते. रिटायर्ड आऊट झालेला फलंदाज मैदानात पुन्हा खेळण्यास येऊ शकत नाही.

तर रिटायर्ड हर्ट झालेला फलंदाज पुन्हा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरू शकतो. जसे शुबमन गिलचे झाले आहे. जर मॅचमध्ये पुढे भारतीय टीमला शुबमन गिलची आवश्यकता भासली तर किंवा गिल स्वत: फिट असला तर विकेट पडल्यानंतर पुन्हा मैदानात उतरू शकतो.

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजाना सुरुवातीपासून चोप दिला.

वन डे वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक ५० षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहितने नावावर करताना टीम इंडियाला दणदणीत सुरुवात करून दिली. पण, टीम साऊदी व केन विलियम्सन यांनी त्याचा वेगाने धावणारा रथ अडवला. रोहित २९ चेंडूं ४ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांवर झेलबाद झाला

शुबमन गिलसोबत त्याची ७१ धावांची भागीदारी संपुष्टात आली. शुबमनने अर्धशतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अर्धशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय सलामीवीर ठरला.