Join us  

IND vs NZ, 3rd T20I Live Update : महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांची परंपरा रोहित शर्मानं कायम राखली, बघा जेतेपदाच्या ट्रॉफीसह काय केलं!, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 11:23 PM

Open in App
1 / 7

India vs New Zealand, 3rd T20I Live Update : राहुल द्रविड याच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या व रोहित शर्माच्या फुल टाईम नेतृत्वाखालील पहिल्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. रोहितनं या विजयानंतर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांची परंपरा कायम राखली. चला जाणून घेऊया त्यानं विजयी चषकासोबत केलं तरी काय...

2 / 7

रोहितचे अर्धशतक आणि अन्य फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर टीम इंडियानं ७ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला अन् प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १११ धावांवर माघारी परतला. भारतानं ७३ धावांनी हा सामना जिंकून मालिका ३-० अशी खिशात घातली.

3 / 7

प्रथम फलंदाजी करताना रोहित- इशान किशन या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ६९ धावा चोपल्या. पण, मिचेल सँटनरच्या एका षटकात किशन ( २९) व सूर्यकुमार यादव ( ०) माघारी परतले. सँटनरनं पुढच्या षटकात रिषभ पंतलाही ( ४) माघारी पाठवले. रोहितनं दमदार खेळी करताना ३१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या.

4 / 7

वेंकटेश अय्यर ( २०) व श्रेयस अय्यर ( २५) यांनी चांगला खेळ केला. हर्षल पटेलनं १८ धावा केल्या. दीपक चहरनं ८ चेंडूंत २१ धावा चोपूलन भारताला ७ बाद १८४ धावांचा पल्ला गाठून दिला. त्यानं अखेरच्या षटकात १९ धावा कुटल्या.

5 / 7

प्रत्युत्तरात न्यूझीलंडकडून मार्टीन गुप्तील ( ५१) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. अक्षर पटेलनं ९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं दोन, तर दीपक चहर, युझवेंद्र चहर व वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १७.२ षटकांत १११ धावांवर माघारी परतला.

6 / 7

रोहित शर्मानं जेतेपदाचा चषक स्वीकारल्यानंतर तो युवा खेळाडूंच्या हाती सुपूर्द केला. वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आवेश खान, ऋतुराज गायकवाड आदी युवा खेळाडूंच्या हाती चषक सोपवून रोहित लांब उभा राहिला.

7 / 7

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माराहूल द्रविड
Open in App