Join us  

IND vs ENG, T20, Virat Kohli : नंबर वन बनण्याची संधी गमावली, विराट कोहलीच्या पाच निर्णयानं टीम इंडियाची गोची केली!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 12:57 PM

Open in App
1 / 9

India vs England, T20I Series : भारतीय संघाला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत दारूण पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं ८ विकेट्स व १० चेंडू राखून हा सामना जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या सामन्यात विराट कोहलीनं ४६ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ७७ धावा केल्या.

2 / 9

भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या धावांवर लगाम लावता आला नाही. जोस बटलरनं ( Jos Buttler) यानं एकहाती सामना फिरवला. बटलरनं ५२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह नाबाद ८३ धावा केल्या. बेअरस्टोनं २८ चेंडूंत ५ चौकारासह नाबाद ४० धावा केल्या. इंग्लंडनं हा सामना ८ विकेट्स व १० चेंडू राखून जिंकला.

3 / 9

विराट कोहलीच्या पाच निर्णयांचा टीम इंडियाला मालिकेत मोठा फटका बसला आहे. ( Virat Kohli’s 5 captaincy decisions that are costing India dearly in T20 Series). तीन सामन्यांत सलामीला तीन वेगवेगळ्या जोडीपासून ते चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या तिढ्यापर्यंत कोहलीचे काही निर्णय चुकलेले पाहायला मिळत आहेत.

4 / 9

या मालिकेत ४-१ असा विजय मिळवून आयसीसी ट्वेंटी-20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी टीम इंडियानं आधीच गमावली आहे. ( India already lost the opportunity to top the ICC World T20I rankings). त्यात इंग्लंडनं तिसरा सामना जिंकून टीम इंडियाला बॅकफूटवर टाकले आहे. आता चौथ्या सामन्यात भारताला योग्य संघ घेऊन मैदानावर उतरावं लागेल.

5 / 9

पहिल्या सामन्यात - लोकेश राहुल/शिखर धवन, दुसऱ्या सामन्यात - लोकेश राहुल/इशान किशन आणि तिसऱ्या सामन्यात - लोकेश राहुल/रोहित शर्मा अशा तीन वेगवेगळ्या सलामीच्या जोडी खेळवण्याचा प्रयोग विराटनं केला अन् तो फसला.

6 / 9

सूर्यकुमार यादव याला वगळण्याचा निर्णय कालच्या सामन्यात फसल्याचे सर्वांना पाहिले. लोकेश राहुलला ( १,०,०) तीन सामन्यांत फक्त एक धाव करता आली आहे आणि त्याला विराट संधी देत आहे. रोहित शर्मासाठी विराटनं कालच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला बाकावर बसवले. सूर्यानं दुसऱ्या सामन्यातून पदार्पण केलं, परंतु त्याला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

7 / 9

युझवेंद्र चहलचे अपयश हेही टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतंय... युझवेंद्रनं जानेवारी २०२०पासून आतापर्यंत ४३.८८च्या सरासरीनं धावा दिल्या आहेत, तर फक्त ९ विकेट्स घेतल्या आहेत. कालच्या सामन्यात त्यानं ४० धावा दिल्या.

8 / 9

चहलला संधी देताना फॉर्मात असलेल्या अक्षर पटेलला वगळण्याचा फटकाही टीम इंडियाला बसलेला जाणवतोय. कसोटी मालिकेत अक्षरनं दमदार कामगिरी केली होती. ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्येही तो उपयुक्त अष्टपैलू खेळाडू म्हणून संघाच्या कामी येऊ शकतो.

9 / 9

संघातील सर्वोत्तम खेळाडू रोहित शर्माला विश्रांती का दिली जातेय... पहिल्या ट्वेंटी-20 सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित खेळेल अशी घोषणा विराटनं केली होती, परंतु प्रत्यक्षात त्याला दोन सामन्यांत विश्रांती देण्यात आली.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीलोकेश राहुलरोहित शर्मायुजवेंद्र चहलसूर्यकुमार अशोक यादव