'नाईट वॉचमन'च्या रुपात कडक फटकेबाजी करणारे ५ गोलंदाज! या पठ्ठ्याच्या नावे तर द्विशतकी रेकॉर्ड

Highest Scores By A Night Watchman : तो नाईट वॉचमनच्या रुपात आला अन् नाबाद द्विशतकासह मोठा रेकॉर्ड सेट केला

लंडन येथील ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात नाईट वॉचमनच्या रुपात चौथ्या फलंदाजीवर आलेल्या आकाशदीपनं आपल्या फलंदाजीचा खास नजराणा पेश केला.

ज्या खेळपट्टीवर फलंदाजांचा निभाव लागणं मुश्किल होतं तिथं या पठ्ठ्यानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकलं.

दुसऱ्या दिवसाअखेर नाईट वॉचमनच्या रुपात मैदानात उतरल्यावर यशस्वी जैस्वालसोबत शतकी भागीदारीसह आकाश दिपनं कसोटीतील तिसरा दिवस गाजवला.

आकाश दीपनं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात ९४ चेंडूत १२ चौकाराच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. इथं एक नज टाकुयात त्याच्याप्रमाणेच जोखीम कमी करण्यासाठी मैदानात उतरुन प्रतिस्पर्ध्यासाठी धोकादाय फलंदाजी करणाऱ्या ५ गोलंदाजांच्या खास कामगिरीवर...

नाईट वॉचमनच्या रुपात फलंदाजीला येऊन ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने द्विशतक झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. जेसन गिलेस्पीनं २००६ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात नाईट वॉचमनच्या रुपात फलंदाजीला आल्यावर २०१ धावांची खेळी केली होती तेही नाबाद.

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज नसीम उल घनी हा नाईट वॉचमनच्या रुपात शतक झळकवणारा पहिला गोलंदाज आहे. १९६२ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानात त्याने इंग्लंडविरुद्ध १०१ धावांची खेळी केली होती.

१९९९ मध्ये अ‍ॅलेक्स ट्यूडोर (Alex Tudor) या इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजाने नाईट वॉचमनच्या रुपात मैदानात उतरत न्यूझीलंडविरुद्ध ९९ धावांची खेळी केली होती. त्याचे शतक अवघ्या एका धावेनं हुकलं. पण त्यानं या खेळीसह सामना अनिर्णित राखत संघाचा पराभव टाळला होता.

भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने नाईट वॉचमनच्या रुपात दोन वेळा अर्धशतक झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. २०१० मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ५० धावांच्या खेळीशिवाय २०११ मध्ये ओव्हलच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध त्याने सचिन तेंडुलकरच्या साथीनं शतकी भागीदारी केली होती. यावेळी त्याने ८४ धावांची खेळी साकारली होती.

२०१५ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात नॅथन लायन याने नाईट वॉचमनच्या रुपात ४७ धावांची खेळी केली होती.