Join us

७०० पेक्षा अधिक टेस्ट विकेट्स! सचिनला नव्हे तर तो विराटला गोलंदाजी करताना घाबरायचा, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 20:01 IST

Open in App
1 / 9

भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेला सुरुवात होण्यााआधीपासून सचिन तेडुंलकर आणि जेम्स अँडरसन ही दोन नावे चर्चेत आहेत.

2 / 9

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला तेंडुलकर-अँडरसन या दिग्गजांच्या नावाची ट्रॉफी देण्यात येणार आहे.

3 / 9

जेम्स अँडरनस हा इंग्लंडचाच नव्हे तर क्रिकेट जगतातील यशस्वी गोलंदाज आहे. १८८ कसोटीत त्याने ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. पण जलदगती गोलंदाजांच्या यादीत तोच टॉपला आहे.

4 / 9

दुसऱ्या बाजूला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

5 / 9

सचिन तेंडुलकर विरुद्ध अँडरसन यांच्या दोघांच्यातील सामना नेहमीच बघण्याजोगा असायचा. दोघांच्या लढाईत कधी सचिन भारी ठरायचा तर कधी अँडरसन बाजी मारायचा.

6 / 9

विराट कोहली विरुद्ध अँडरसन असा सामनाही पाहायला मिळाला आहे. इंग्लंडच्या ताफ्यातून खेळताना अँडरसन याने कोहलीला दमवल्याचेही पाहायला मिळाले आहे.

7 / 9

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेआधी जेम्स अँडरसन याने सचिन तेंडुलकरच्या तुलनेत विराट कोहलीला गोलंदाजी करणं कठीण होते, असे म्हटले आहे.

8 / 9

विराट कोहलीसंदर्भात अँडरसन म्हणाला आहे की, सुरुवातीला ऑफ स्टंप बाहेर जाणाऱ्या चेंडूवरील त्याची कमजोरी ओळखून मी त्याच्यावर भारी पडलो. पण त्यानंतर त्याने आपले तेवर बदलल्याचे जाणवले.

9 / 9

विराट कोहली हा आक्रमक अंदाजात खेळायचा. त्याने बॅटिंगमधील उणीव भरून काढत पलटवार करताना माझा दबदबा कमी केला. तेंडुलकर विरुद्ध गोलंदाजी करताना हे अनुभवले नाही. त्यामुळे विराट कोहलीला गोलंदाजी करणं कठीण होते, असे अँडरसन याने म्हटले आहे.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५सचिन तेंडुलकरविराट कोहलीजेम्स अँडरसनभारत विरुद्ध इंग्लंड