Join us

३ 'आउट' अन् २ 'इन'! मागील ४ वर्षांत इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय फलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 19:59 IST

Open in App
1 / 8

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडच्या मैदानातील १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

2 / 8

यावेळी इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियात २०२१ पासून इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच भारतीय खेळाडूंमधील फक्त दोघांचाच समावेश आहे.

3 / 8

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. दुसरीकडे या यादीत असणारा पुजाराही संघाबाहेर आहे. इथं एक नजर टाकुयात २०२१ पासून इंग्लंडच्या मैदानात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या ५ भारतीय फलंदाजांच्या रेकॉर्डवर

4 / 8

२०२१ पासून इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वलस्थानी आहे. यंदाच्या इंग्लंड दौऱ्याआधीच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. ६ सामन्यातील १२ डावात त्याने ४४.५४ च्या सरासरीने ४९० धावा केल्या आहेत. यात एका शतकासह दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

5 / 8

रिषभ पंतने २०२१ पासून इंग्लंडमध्ये ६ कसोटी सामने खेळले असून ११ डावात त्याने ३५.८१ च्या सरासरीने १ शतक आणि दोन अर्धशतकाच्या मदतीने ३९४ धावा केल्या आहेत.

6 / 8

चेतेश्वर पुजाराने २०२१ पासून ७ कसोटी सामन्यातील १४ डावात २८.४६ च्या सरासरीसह ३७० धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. यात त्याच्या भात्यातून ३ अर्धशतके आली होती.

7 / 8

विराट कोहलीनं २०२१ पासून ७ सामन्यातील १३ डावात २८.३८ च्या सरासरीने २ अर्धशतकासह ३६९ धावा केल्यात. त्यानेही कसोटीतून निवृत्ती घेतली आहे.

8 / 8

रवींद्र जडेजानं २०२१ पासून ७ सामन्यातील १३ डावात २८.१५ च्या सरासरीने ३६६ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मारिषभ पंतचेतेश्वर पुजाराविराट कोहलीरवींद्र जडेजा