"जडेजा हा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही", इंग्लंडच्या दिग्गजानं सांगितला फिरकीपटूंना लोळवण्याचा मंत्र

Kevin Pietersen On Ravindra Jadeja: भारतीय संघ २५ जानेवारीपासून इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

भारतीय संघ आगामी काळात (२५ जानेवारी) मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून, फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी इंग्लिश खेळाडू खास तयारी करत आहेत.

भारतातील खेळपट्टीवर फिरकीपटूंचा वरचष्मा राहिला आहे. याचाच दाखला देत इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने आपल्या संघाला सावध केले. तसेच भारतीय फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी मंत्र सांगितला.

भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाला सामोरे जाण्याचा मंत्र इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने इंग्लिश फलंदाजांना दिला आहे.

रवींद्र जडेजा मुथय्या मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही, त्याचा सामना करण्यासाठी तुमची तयारी चांगली असेल तर काहीच अडचण येत नाही, असेही त्याने सांगितले.

'द टाइम्स'शी बोलताना पीटरसनने म्हटले, "मी अनेकदा जडेजाचा सामना केला आहे, तुमची तयारी चांगली असेल तर अडचण येणार नाही. जडेजा मुरलीधरन नाही किंवा शेन वॉर्न नाही. तो केवळ एक डावखुरा गोलंदाज आहे."

तसेच तुमची रणनीती चांगली असेल तर जडेजाविरुद्ध कोणतीही अडचण येणार नाही. जर तुमचे पाय योग्य ठिकाणी असतील, तुम्ही पुढच्या पायावर खेळत नसाल तर तो फलंदाज सुरक्षित असेल. बोल्ड किंवा एलबीडब्ल्यू होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असेही त्याने नमूद केले.

दरम्यान, इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारतीय संघ आगामी काळात मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघाचा हिस्सा नसलेल्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतून एन्ट्री होणार आहे. ट्वेंटी-२० मालिकेतून दोघांनाही ब्रेक देण्यात आला आहे. आवेश खान आणि मुकेश कुमार यांना संघात जागा मिळवण्यात यश आले आहे.

अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचाही टीम इंडियात समावेश आहे. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे अष्टपैलू खेळाडूही इंग्लंडविरुद्ध टीम इंडियात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले.

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान.