Join us  

IND vs ENG, 2nd T20, Ishan Kishan : इशान किशननं फक्त मॅचच नाही, तर मनही जिकंली; सामन्यानंतर त्यानं जे केलं त्याचं होतंय कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 9:29 AM

Open in App
1 / 9

IND vs ENG, 2nd T20 : इशान किशननं ( Ishan Kishan) भारत-इंग्लंड दुसऱ्या ट्वेंटी-20 ( India vs England, 2nd T20I) सामन्यात पदार्पण करताना धमाका केला. इंग्लंडनं विजयासाठी ठेवलेलं १६५ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ७ विकेट्स व १३ चेंडू राखून सहज पार केलं.

2 / 9

लोकेश राहुल याही सामन्यात अपयशी ठरला. तो पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर भोपळ्यावर बाद झाला. पण, पदार्पणवीर इशान किशन ( Ishan Kishan) यानं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली.

3 / 9

पदार्पणाच्या सामन्यात ३२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून ५६ धावांची खेळी करणाऱ्या इशान किशनला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. ट्वेंटी-२० पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी अजिंक्य रहाणेनं २०११मध्ये इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-20 पदार्पणात अर्धशतक झळकावले होते.

4 / 9

सामन्यानंतर इशान म्हणाला,''काही दिवसांपूर्वी माझ्या प्रशिक्षकांच्या वडिलांचे निधन झाले. आजची खेळी मी त्यांना समर्पित करतो. मला स्वतःला सिद्ध करायचे होते, कारण माझ्या प्रशिक्षकांनी त्यांच्या वडिलांसाठी किमान अर्धशतक झळकाव, असे सांगितले होते. त्यामुळेच हा पुरस्कार त्यांना समप्रित करतो.''

5 / 9

इशान किशन म्हणाला की,''तुला आज सलामीला खेळायचे आहे, असे रोहित भाईनं मला सामन्यापूर्वी सांगितले होते. आयपीएलमध्ये खेळतोस, तसाच खेळ आणि मनात कोणताही गोंधळ ठेऊ नकोस, असेही रोहितनं सांगितले. मी सुरुवातीला थोडासा भांबावलो होतो, परंतु जेव्हा मी राष्ट्रीय ध्वज पाहिला आणि टीम इंडियाची जर्सी घातली, तेव्हा तुम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करता.''

6 / 9

पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणारा इशान किशन हा चौथा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी २०१३मध्ये मोहित शर्मा ( वि. झिम्बाब्वे), २०१८ मध्ये पृथ्वी शॉ ( वि. वेस्ट इंडिज), २०१९मध्ये नवदीप सैनी ( वि. वेस्ट इंडिज) यांनी पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकला होता.

7 / 9

इशान किशनच्या खेळीनं सर्वकाही सोपं केलं, असे मत कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) व्यक्त केलं. इशाननं मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार त्याच्या प्रशिक्षकाच्या वडिलांना समर्पित केलं. काही दिवसांपूर्वी इशानच्या प्रशिक्षकांच्या वडिलांचे निधन झाले.

8 / 9

''अखेर मला ही संधी मिळाली, याचा मला आनंद वाटतोय. मेहनतीचं फळ मिळतंच. आता मला माझा खेळ दाखवायचा आहे. मला या सामन्याचा शेवट करायचा होता. मुंबई इडियन्सनं मला बरंच काही शिकवलं. मुंबईच्या संघात बरेच सीनियर खेळाडू आहेत आणि त्यांनी मला माझा खेळ सुधारण्यास मदत केली,''असेही इशान म्हणाला.

9 / 9

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीरोहित शर्मामुंबई इंडियन्सइशान किशन