Join us

IND vs ENG, 2nd ODI : विराट कोहली-लोकेश राहुल यांची शतकी भागीदारी, कर्णधारानं मोडला ग्रॅमी स्मिथचा मोठा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 16:09 IST

Open in App
1 / 7

विराट कोहलीनं ६२ चेंडूंत ३ चौकार अन् ५० धावा केल्या. वन डे क्रिकेटमधील ६२ वे अर्धशतक ठऱले आणि सलग चौथ्या वन डे सामन्यात त्यानं ५०+ धावा केल्या. त्यानं या कामगिरीसह दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ ( Graeme Smith) विक्रम मोडला.

2 / 7

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर ( Jos Buttler) यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघानं आजच्या सामन्यात रिषभ पंतला संधी देत एक बदल केला, तर इंग्लंडच्या संघात तीन बदल पाहायला मिळत आहेत.

3 / 7

पहिल्या वन डे सामन्यात ९८ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला ( Shikhar Dhawan) आज आपयश आलं. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या रिले टॉप्लीनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. धवन ( ४) स्लीपमध्ये बेन स्टोक्सच्या हाती झेल देऊन माघारी परतला.

4 / 7

त्यानंतर सॅम कुरननं इंग्लंडला मोठी विकेट मिळवून दिली. रोहित शर्मा ( २५) ९व्या षटकात कुरनच्या गोलंदाजीवर आदिल राशिदच्या हाती झेल देऊन बाद झाला. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

5 / 7

विराटपाठोपाठ लोकेशनंही अर्धशतक पूर्ण केलं. विराटनं ४१वी धाव घेताच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याचा विक्रम मोडला. वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम विराटनं मोडला. तो पाचव्या स्थानावर आला आहे.

6 / 7

ग्रॅमी स्मिथच्या नावावर १५० सामन्यांत ५४१६ धावा आहेत. विराटनं तो विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग ८४९७ धावांसह अव्वल क्रमांकावर आहे. महेंद्रसिंग धोनी ६६४१ धावांसह दुसऱ्या व स्टीफन फ्लेमिंग ( ६२९५) - अर्जुन रणतुंगा ( ५६०८) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

7 / 7

विराट कोहली ७९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून ६६ धावांवर आदिल राशिदच्या गोलंदाजीवर बाद झाला. आशिया खंडात विराटनं १५० षटकारांचा विक्रमही केला. शाहिद आफ्रिदी ( २९१), रोहित शर्मा ( २६२), महेंद्रसिंग धोनी ( २३९), सनथ जयसूर्या ( १९८), सचिन तेंडुलकर ( १८९), युवराज सिंग ( १७०), वीरेंद्र सेहवाग ( १६४) यांच्यानंतर विराटचा क्रमांक येतो.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीलोकेश राहुल