Join us  

India vs England, 1st Test Day 5 : थर्ड अम्पायरची बारीक नजर अन् टीम इंडियाच्या नावे नकोसा विक्रम!

By स्वदेश घाणेकर | Published: February 09, 2021 9:44 AM

Open in App
1 / 9

India vs England, 1st Test Day 5 : पाहुण्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत टीम इंडियाची घरच्या मैदानावर अशी अवस्था होईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. भारताला पराभव टाळण्यासाठी आता पाचव्या दिवशी संघर्ष करावा लागत आहे. इंग्लंडच्या ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा पहिला डाव ३३७ धावांवर गडगडला.

2 / 9

२४१ धावांची आघाडी घेऊन इंग्लंडचा संघ पुन्हा मैदानावर उतरला. पण, यावेळी आर अश्विननं ६ विकेट्स घेत त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पहिल्या डावातील द्विशतकवीर कर्णधार जो रूटनं सर्वाधिक ४० धावा केल्या. इंग्लंडचा डाव १७८ धावांवर गडगडला. पण, तरीही भारतासमोर ४२० धावांचं तगडं आव्हान उभं राहिलं.

3 / 9

रोहित शर्मा व शुबमन गिल ही जोडी चांगली फटकेबाजी करताना दिसली. परंतु जॅक लीचनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. रोहित १५ धावांवर माघारी परतला. चौथ्या दिवसअखेर टीम इंडियानं १ बाद ३९ धावा केल्या होत्या.

4 / 9

पाचव्या दिवशी ९० षटकांत भारताला विजयासाठी ३८१ धावा करायच्या आहेत, तर इंग्लंडला विजयासाठी ९ विकेट्स घ्यायच्या आहेत. निकाल ड्रॉ लागल्यास टीम इंडियाला उर्वरित ३ कसोटींपैकी दोन जिंकाव्या लागतील, तरत ते जागतिक कसोटीच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकतील. २०१३नंतर भारतानं घरच्या मैदानावर फक्त एकच सामना गमावला आहे.

5 / 9

या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी नकोसा विक्रमही नावावर केला. भारतीय गोलंदाजानं पहिल्या कसोटीत एकूण २७ नो बॉल फेकले. पहिल्या डावात २० ( इशांत शर्मा ५, जसप्रीत बुमराह ७ व शाहबाज नदीम ६) आणि दुसऱ्या डावात ७ ( बुमराह १, अश्विन व नदीम ३) असे नो बॉल टाकले.

6 / 9

कसोटीच्या एका डावात सर्वाधिक ४० नो बॉल फेकण्याचा विक्रम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. इंग्लंडनं १९८६ साली वेस्ट इंडिजविरुद्ध १०७.४ षटकांत ४० नो बॉल टाकले होते, तर १९८९च्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं विंडीजविरुद्ध १४०.५ षटकांत ४० नो बॉल टाकले होते.

7 / 9

कसोटीच्या एका डावात सर्वाधिक ४० नो बॉल फेकण्याचा विक्रम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. इंग्लंडनं १९८६ साली वेस्ट इंडिजविरुद्ध १०७.४ षटकांत ४० नो बॉल टाकले होते, तर १९८९च्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं विंडीजविरुद्ध १४०.५ षटकांत ४० नो बॉल टाकले होते.

8 / 9

त्यानंतर पाकिस्तान ( ३९ नो बॉल वि. श्रीलंका, २००२), पाकिस्तान ( ३८ नो बॉल वि. वेस्ट इंडिज १९८८) आणि ऑस्ट्रेलिया ( ३७ नो बॉल वि. वेस्ट इंडिज १९८८) यांचा क्रमांक येतो.

9 / 9

एका कसोटीत सर्वाधिक नो बॉलचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. त्यांनी १९८७च्या कसोटीत पाकिस्तानविरुद्ध ३९५.२ षटकांत १०३ नो बॉल टाकले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( ९० नो बॉल वि. वेस्ट इंडिज १९८८), वेस्ट इंडिज ( ८१ नो बॉल वि. इंग्लंड, १९९४), वेस्ट इंडिज ( ७९ नो बॉल वि. इंग्लंड १९७४) आणि वेस्ट इंडिज ( ७८ नो बॉल वि. ऑस्ट्रेलिया १९९९) यांचा क्रमांक येतो.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघआर अश्विनजसप्रित बुमराह