भारतीय संघाने चेन्नई कसोटी सामन्यात पाहुण्या बांगलादेश संघासमोर ५१५ धावांचे टार्गेट सेट केले आहे.
कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात चेपॉकच्या मैदानातील हे सर्वोच्च टार्गेट आहे. या सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं लागेल, अशी अपेक्षा आहे.
इथं एक नजर टाकुयात चेन्नईच्या मैदानातील सर्वोच्च धावंसख्या आणि सामन्याच्या निकालासंदर्भातील खास रेकॉर्ड्सवर
याआधी २०२१ मध्ये भारतीय संघाने चेपॉकच्या मैदानात इंग्लंडच्या संघासमोर ४८२ धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली होती.
१९८९ मध्ये भारतीय संघाने चेन्नईच्या चेपॉकवर वेस्ट इंडीजच्या संघासमोर ४१६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवला होता.
१९३४ मध्ये इंग्लंडच्या संघाने चेपॉकच्या मैदानात टीम इंडियासमोर ४५२ धावांचं आव्हान ठेवले होते. हा कसोटी सामना इंग्लंडच्या संघाने जिंकला होता.