अजब-गजब !! टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात केले २ विचित्र पराक्रम

Team India 2 Records, World Cup 2023, IND vs AUS: एक विक्रम अभिमानास्पद तर दुसरा लाजिरवाणा

Team India 2 Records, World Cup 2023, IND vs AUS: भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरूवात विजयाने केली. सामनावीर केएल राहुलच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघाला सहा गडी राखून पराभूत केले.

भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला १९९ धावांवर रोखले. रविंद्र जाडेजाने ३ तर कुलदीप-बुमराहने प्रत्येकी २-२ बळी टिपले.

२०० धावांचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरूवात वाईट झाली. अवघ्या २ धावांत भारताचे ३ गडी माघारी परतले होते. पण मधल्या फळीतील अनुभव भारताच्या कामी आला.

रनमशिन विराट कोहली आणि दुखापतीतून पुनरागमन केलेला केएल राहुल यांनी सामना जिंकवला. केएल राहुलच्या नाबाद ९७ धावा आणि विराट कोहलीच्या ८५ धावांमुळे टीम इंडियाने विजय मिळवला.

भारतीय संघाने या सामन्यात अनेक वेगवेगळे विक्रम केले. मात्र भारतीय संघाने दोन अजब-गजब विक्रम आपल्या नावे केले. त्यापैकी एक विक्रम अभिमानास्पद तर दुसरा लाजिरवाणाच म्हणाला लागेल.

लाजिरवाणा विक्रम म्हणजे वर्ल्ड कप सामन्यात केवळ दुसऱ्यांदा भारताचे दोनही सलामीवीर शून्यावर बाद झाले. याआधी १९८३च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरूद्ध असा विचित्र विक्रम भारताच्या नावे झाला होता.

तर अभिमानास्पद वाटणारा पराक्रम म्हणजे, सर्वात कमी धावांवर म्हणजेच २ धावांत ३ बळी गमावल्यावरही तो सामना जिंकण्याचा विक्रम भारताने आपल्या नावे केला. याआधीचा विक्रमही भारताच्याच नावे होता. २००४ मध्ये ४ धावांत ३ बळी गमावल्यानंतर भारताचने तो सामना जिंकला होता.