IND vs AUS 1st ODI : रोहित शर्मा नाही, श्रेयस अय्यरची माघार! हार्दिक पांड्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला मिळेल आधार?

India Playing XI vs Australia: बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे.

बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. वानखेडे स्टेडियमवर पहिला वन डे सामना शुक्रवारी खेळवला जाणार आहे, परंतु त्याआधी भारतीय संघाला दुखापतीचा फटका बसलेला आहे

श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांनी दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतलेली आहे. रोहित शर्मा कौटुंबिक कारणास्तव पहिला सामना खेळणार नाही आणि हार्दिक पांड्या वानखेडेवर नेतृत्व कररताना दिसेल. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्यासाठी वन डे संघाची दारं उघडी झाली आहेत.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत इशान किशन आणि शुबमन गिल ही जोडी पहिल्या वन डेत सलामीला खेळताना दिसेल. श्रेयस नसल्याने सूर्यकुमार यादवला वन डे संघात संधी मिळेल आणि लोकेश राहुल मधल्या फळीत खेळू शकतो. वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यापैकी कोण खेळेल याची उत्सुकता आहे.

२०२३ चा वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन भारतासाठी ही तीन सामन्यांची वन डे मालिका महत्त्वाची आहे. इशान किशनने डिसेंबरमध्ये वन डेत द्विशतक झळकावले होते. विराट कोहलीनेही वन डे क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ संपवला आहे आणि तो पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल.

श्रेयस अय्यर व रिषभ पतं हे दोघंही दुखापतीमुळे या मालिकेत नाहीत आणि त्यामुळे सूर्यकुमार यादवचे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे निश्चित मानले जात आहे. वन डे क्रिकेटमध्ये सूर्याला प्रभाव पाडता आलेला नाही. कर्णधार हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा फिनिशरची भूमिका बजावताना दिसतील.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर/शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव/युजवेंद्र चहल.