Join us  

IPL 2024 Auction : वर्ल्ड कप गाजवणारे १० खेळाडू IPL लिलावात खाणार 'भाव', कांगारूंचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 5:39 PM

Open in App
1 / 10

वन डे विश्वचषक २०२३ नंतर आयपीएल २०२४ च्या लिलावात कोणते खेळाडू सर्वाधिक भाव खाणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघातील काही खेळाडूंवर फ्रँचायझींची नजर असेल यात शंका नाही. भारताविरूद्धच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ट्रॅव्हिस हेडवर आगामी लिलावात पैशांचा पाऊस होऊ शकतो.

2 / 10

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यापूर्वी आयपीएल खेळला आहे. आगामी आयपीएल लिलावासाठी स्टार्कने नोंदणी केल्यास त्याच्यावर देखील सगळ्यांचे लक्ष असेल. सर्वाधिक महागडा गोलंदाज म्हणूनही स्टार्क समोर येऊ शकतो.

3 / 10

श्रीलंकेच्या संघाला यंदाच्या विश्वचषकात काही खास कामगिरी करता आली नाही. पण, संघाचा फिरकीपटू दिलशान मदुशंकाने अप्रतिम खेळीने सर्वांना प्रभावित केले. जवळपास सर्वच श्रीलंकन खेळाडूंनी चाहत्यांना निराश केले पण मदुशंका याला अपवाद ठरला.

4 / 10

नवख्या अफगाणिस्तानने इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या संघांना पराभवाची धूळ चारून इतिहास रचला. अफगाणिस्तानच्या विजयात फिरकीपटूंनी मोलाची भूमिका बजावली. अष्टपैलू अजमतुल्लाह ओमरजईने ९ सामन्यांत ३५३ धावा आणि ७ बळी घेतले. त्यामुळे आयपीएल लिलावात याचाही भाव वाढू शकतो.

5 / 10

गेराल्ड कोएत्जी विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये आहे. ८ सामन्यांमध्ये संधी मिळालेल्या कोएत्जीने २० बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थितीत पोहचवले.

6 / 10

भारतीय वंशाचा रचिन रवींद्र यंदाच्या विश्वचषकातून न्यूझीलंडचा एक स्टार म्हणून समोर आला. त्याने १० सामन्यांत ५७८ धावा करून किवी संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवण्यात मोठा हातभार लावला. सुरूवातीपासून स्फोटक खेळी करण्याची क्षमता असलेल्या रचिनवर आगामी आयपीएल लिलावात फ्रँचायझींचे लक्ष असेल.

7 / 10

नेदरलॅंड्सच्या बॉस डी लीडेने आपल्या अष्टपैलू खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. ९ सामन्यांत त्याला १६ बळी घेण्यात यश आले.

8 / 10

इंग्लंडच्या संघाने यंदा त्यांच्या इंग्लिश चाहत्यांसह क्रिकेट विश्वाला नाराज केले. २०१९ चा किताब जिंकणाऱ्या संघाला भारतात संघर्ष करावा लागला. पण डेव्हिड मलानने काही सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करून संघाची लाज राखली.

9 / 10

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने संयम आणि सावध खेळीच्या जोरावर आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. सुरूवातीला कांगारूंना सलग दोन सामने गमवावे लागले. पण त्यानंतर विजयरथ कायम ठेवत कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने जग्गजेतेपद मिळवले.

10 / 10

श्रीलंकेच्या सदीरा समरविक्रमाने आशिया चषकापासून सातत्याने चांगली कामगिरी केली. वन डे विश्वचषकात देखील (३७३ धावा) प्रभावी कामगिरी करण्यात त्याला यश आले. त्यामुळे त्याच्यावर देखील आयपीएल लिलावात सर्वच फ्रँचायझींचा डोळा असेल.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपआयपीएल लिलावआॅस्ट्रेलिया