Join us

IPL 2021 : मला तुझा अभिमान वाटतो!, पृथ्वी शॉ यानं केली KKRच्या गोलंदाजांची धुलाई अन् घायाळ झाली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 16:32 IST

Open in App
1 / 10

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) गुरूवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) दमदार फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सवर ( KKR) ७ विकेट्स राखून विजय मिळवला.

2 / 10

विजयासाठी १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वीनं पहिल्याच षटकात सहा चौकार खेचून इतिहास रचला. आयपीएलमध्ये डावाच्या पहिल्याच षटकात सहा चौकार खेचणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. २०१२मध्ये अजिंक्य रहाणे यानंही सहा चेंडूंत सहा चौकार खेचले होते, परंतु ते पहिले षटक नव्हते.

3 / 10

पृथ्वीनं शिखर धवनसोबत पहिल्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी करताना ४१ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीनं १६.३ षटकांत ७ विकेट्स राखून हे लक्ष्य सहज पार केले. पृथ्वीला या सामन्यात मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

4 / 10

पृथ्वीच्या या फटकेबाजीचे क्रिकेट वर्तुळात सर्वांनी कौतुक केलं, परंतु यात त्याची कथित गर्लफ्रेंड प्राची सिंग ( Prachi Singh) हिनं केलेलं कौतुक व्हायरल झालं आहे.

5 / 10

मला तुझा अभिमान वाटतो, अशी इस्टा स्टोरी प्राचीनं पोस्ट केली. त्यात पृथ्वीचा फोटोही आहे. मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराचे चेक ठेवण्यासाठी एक सुटकेस घे, असाही सल्ला तिनं दिला आहे.

6 / 10

पृथ्वीच्या पोस्टवर प्राची सातत्यानं लाईक्स अन् कमेंट्स करत आहे. इतकेच नाही, तर पृथ्वीही तिच्या कमेंट्सवर प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे. प्राची अन् पृथ्वीच्या या गप्पा-टप्पांवरून नेटिझन्सनी त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

7 / 10

प्राची सिंह हिनं Colors TVवरील उडान या कार्यक्रमात काम केलं होतं.

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :आयपीएल २०२१पृथ्वी शॉदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स