ICONIC ! 'वर्ल्ड लीडर' म्हणत माजी क्रिकेटरकडून मोदींचं कौतुक

देशातील टायगर प्रकल्पाला आज ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यादरम्यान बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील सफारीचा आनंद घेतला.

देशातील टायगर प्रकल्पाला आज ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यादरम्यान बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील सफारीचा आनंद घेतला.

पीएम मोदींनी यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय पीएम मोदींनी तामिळनाडूतील हत्तींची भेट घेत स्वतःच्या हाताने काही हत्तींना ऊस खाऊ घातले.

पंतप्रधान मोदी यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. या दौऱ्यात खास गोष्टीने लक्ष वेधले ते म्हणजे ऑस्कर विजेती डॉक्युमेंटरी 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) मधील बोमन आणि बेली या जोडप्याचीही पंतप्रधानांनी भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या जोडप्याने सांभाळ केलेल्या 'रघू' या हत्तीसोबतही पंतप्रधानांचे फोटो आहेत.

तमिळनाडूतील मृदुमलाई जंगलात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफारीचा आनंद घेतला. याच ठिकाणी थेप्पाकडू हा एलिफंट कॅम्प आहे. मोदींचा जंगल सफारीचा दिवस आज सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मोदींच्या जंगल सफारीतील लूकचीही चांगलीच चर्ता होतेय, त्यामुळे मोदींचे जंगलातील फोटोही व्हायरल झाले आहेत. इंग्लंडचा माजी फलंदाज केवीन पीटरसननेही मोदींचा फोटो शेअर केलाय.

मोदींचा जंगल सफारीचा फोटो शेअर करत, आंतरराष्ट्रीय नेते, ज्यांना वन्य प्राणी आवडतात, वन्य प्राण्यांसोबत नैसर्गिक अधिवासात वेळ घालवताना ते खूप उत्साही असतात, असे पीटरसननेम म्हटले आहे.

विशेष म्हणजे, गतवर्षीच्या आपल्या जन्मदिनी त्यांनी भारतातील जंगलात आफ्रिकन चित्ते आणून सोडले होते. ते नायक नरेंद्र मोदी... असे ट्विट केवीन पीटरसनने केलंय. यासोबतच, मोदींना आयकॉनिक असेही म्हटले आहे.

दरम्यान, पीटरसन हा वन्यजीव असलेल्या गेंड्यांसाठी काम करतो आणि जास्त काळ काझिरांगामध्येच असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनी केवीन पीटरसनला पत्र लिहून त्याचे अभिनंदन आणि कौतुक केले होते