Join us  

ICC World Cup 2019 : विश्वचषकात सर्वात सामनावीराचे पुरस्कार कोणी जिंकले, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 5:17 PM

Open in App
1 / 6

यंदाच्या विश्वचषकात धुमाकुळ घातला तो भारताचा सलामीवीर रोहित शर्माने. रोहितने यंदाच्या विश्वचषकात पाच शतके झळकावत इतिहास रचला.

2 / 6

रोहितने या विश्वचषकात चारवेळा सामनावीराचा पुरस्कार पटकवला. त्याचबरोबर या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचा मानही रोहितला मिळाला.

3 / 6

बांगलादेशचा अष्टपैलू शकिब अल हसनने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्रिकेट जगताला आपली दखल घ्यायला भाग पाडले.

4 / 6

शकिबने या विश्वचषकात 606 धावा मिळवल्या आणि 11 विकेट्स पटकावले. या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शकिबने या विश्वचषकात तीनवेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

5 / 6

तब्बल एका वर्षाच्या कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर विश्वचषकात खेळायला सज्ज झाला होता. एक वर्ष न खेळल्याचा सारा राग वॉर्नरने धावांच्या रुपात काढला.

6 / 6

यंदाच्या विश्वचषकात वॉर्नरने सहाशेपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. या विश्वचषकात सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये वॉर्नर रोहितनंतर दुसऱ्या स्थानावर होता. वॉर्नरने या विश्वचषकात तीन वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

टॅग्स :रोहित शर्माडेव्हिड वॉर्नरवर्ल्ड कप 2019