मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून लंडनमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास उपांत्य फेरीत संपला. न्यूझीलंडने 18 धावांनी भारतावर विजय मिळवत, सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न तुटल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर त्याचे शल्य दिसत होते.
यावेळी अनुष्का शर्माही कोहलीसोबत दिसली
रोहित शर्माचा या स्पर्धेतील फॉर्म जबरदस्त राहिला आहे. त्यानं 5 शतकी खेळी करताना 648 धावा चोपल्या.
विजय शंकरला बदली खेळाडू म्हणून संघात दाखल झालेला मयांक अगरवार हा पर्यटक म्हणूनच संघासोबत राहिला
केदार जाधवला फार काही कमाल करता आली नाही. त्यामुळे त्याला उपांत्य फेरीच्या सामन्यातही बाकावर बसवण्यात आले
लोकेश राहुल यालाही सातत्य राखण्यात अपयश आले.