ललित झांबरे - विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा इंग्लंडला भारी ठरला आहे. लागोपाठ चौथ्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी इंग्लंडवर विजय मिळवला आहे. चालू शतकात इंग्लिश संघ अद्याप एकदाही श्रीलंकेला विश्वचषक स्पर्धेत हरवू शकलेला नाही. २००३ च्या विश्वचषकात या दोन संघात सामना झाला नव्हता पण २००७,११ आणि १५ च्या स्पर्धेत लंकन संघ इंग्रजांना भारीच ठरला होता.
४ एप्रिल २००७- नॉर्थ साऊंड- श्रीलंका दोन धावांनी विजयी
२६ मार्च २०११- कोलंबो - श्रीलंका दहा गड्यांनी विजयी
१ मार्च २०१५- वेलिंग्टन- श्रीलंका नऊ गड्यांनी विजयी
२१ जून २०१९- लीडस- श्रीलंका २० धावांनी विजयी