या वर्ल्डकपमध्ये दिनेश कार्तिकला संधी मिळेल का आणि तो संघातीय स्थान टिकवेल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
वर्ल्डकपच्या संघात रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले असले तरी यापूर्वी तो एकदिवसीय संघामधून जास्त खेळला नव्हता. त्यामुळे वर्ल्डकपनंतर तो एकदिवसीय संघात असेल का, यावर प्रश्नचिन्ह आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वात टीका झाली होती ती लोकेश राहुलच्या निवडीवरून. पण वर्ल्डकप जर त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही तर त्याला संघातून बाहेर काढण्यात येऊ शकते.
अष्टपैलू विजय शंकरला कामगिरीत सातत्य दाखवता आलेले नाही. वर्ल्डकप जर त्याच्याकडृून अपेक्षित कामगिरी झाली नाही तर त्याला डच्चू देण्यात येऊ शकतो.
महेंद्रसिंग धोनी वर्ल्डकपनंतर निवृत्ती जाहीर करणार, अशी चर्चा आहे. पण जर वर्ल्डकपमध्ये धोनीला चांगली कामगिरी करता आली नाही तर त्याच्यासाठी रिषभ पंत हा पर्याय ठरू शकतो.