सलामीवीर शिखर धवनने 109 चेंडूंत 117 धावांची दमदार खेळी साकारली.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने धवनबरोबर 93 धावांची भागीदारी रचली. त्याचबरोबर 82 धावांची दमदार खेळीही साकारली.
हार्दिक पंड्याने 27 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 48 धावांची झंझावीत खेळी साकारली.
भुवनेश्वर कुमारने या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नावाजलेला फलंदाज स्टीव्हन स्मिथसह तीन खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला.
जसप्रीत बुमराने या सामन्यात जास्त धावा दिल्या असल्या तरी त्याने तीन फलंदाजांना बाद केले.