आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजने आतापर्यंत केलेली कामगिरी चांगली आहे. मात्र, वेस्ट इंडिजचा सलामी फलंदाज ख्रिस गेलने अद्याप आपली झंझावात खेळी केली नाही. असे असले तरी ख्रिस गेल सध्या वर्ल्ड कप स्पर्धेचा चांगलाच आनंद घेतोय.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ख्रिस गेल कॅमेरामॅन बनला.
ख्रिस गेलने दक्षिण आफ्रिकेसाठी आयसीसी इव्हेंट कव्हर करणाऱ्या एल्मा स्मिटसोबत खास संवाद साधला.
यावेळी कॅमेरा घेऊन ख्रिस गेलने एल्मा स्मिट आणि मैदानावरील चित्रण केले.
तो म्हणला की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात द्विशतक करेन.
गेल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबविण्यात आला होता. त्यामुळे द्विशत करणे शक्य नव्हते, असेही ख्रिस गेल यावेळी म्हणाला.
दरम्यान, गेल्या वर्ल्ड कपमध्ये ख्रिस गेलने झिम्बॉम्बेविरुद्ध द्विशतक ठोकले होते. ख्रिस गेल एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा एकमेव डावखुरा फलंदाज आहे.