Join us

IPL 2020 : 'I am so proud of you baby'; सुपर मॉडलनं केलं इशान किशनचे कौतुक, Photo Viral

By स्वदेश घाणेकर | Updated: September 29, 2020 17:18 IST

Open in App
1 / 13

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातील सामना चुरशीचा होईल, याची सर्वांना अपेक्षा होती. पण, तो सुपर ओव्हरमध्ये जाईल, असा विचार कुणी केलाच नसावा. मुंबई इंडियन्सनं ( MI) दमदार खेळ करताना 201 धावांपर्यंत मजल मारली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही.

2 / 13

सुपर ओव्हरमध्ये नवदीन सैनीनं ( Navdeep Saini) केलेल्या टिच्चून माऱ्यानं MIचा पराभव पक्का केला. या पराभवानंतर इशान किशनचा ( Ishan Kishan) चा दुःखी बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. MIच्या हातून निसटलेला सामना इशाननं आणून दिला होता, परंतु नशीबाचा कौल RCBच्या बाजूनं होता.

3 / 13

प्रथम फलंदाजीला आलेल्या RCBनं आरोन फिंच ( Aaron Finch), देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांच्या अनुक्रमे 52, 54 आणि 55 धावांच्या जोरावर 3 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला. मुंबई इंडियन्सला सुरुवातीला बसलेल्या धक्क्यानंतर RCBचा विजय पक्का मानला जात होता.

4 / 13

MIला अखेरच्या पाच षटकांत म्हणजेच 30 चेंडूत 90 धावा हव्या होत्या. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या इशान किशन ( Ishan Kishan) आणि किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यांनी सामना खेचून आणला. इशान 58 चेंडूंत 2 चौकार व 9 षटकार खेचून 99 धावांवर माघारी परतला अन् सामन्यात पुन्हा चुरस निर्माण झाली.

5 / 13

पोलार्डला अखेरच्या चेंडूवर 5 एवजी चारच धावा करता आल्यानं MI ला 5 बाद 201 धावांवर समाधान मानावे लागले. पोलार्डनं 24 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 60 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. RCBच्या नवदीप सैनीनं ( Navdeep Saini) टिच्चून मारा करताना MIला 7 धावांवर रोखले आणि विराट कोहली व एबी यांनी हे लक्ष्य पार करून RCBला विजय मिळवून दिला.

6 / 13

पोलार्डला अखेरच्या चेंडूवर 5 एवजी चारच धावा करता आल्यानं MI ला 5 बाद 201 धावांवर समाधान मानावे लागले. पोलार्डनं 24 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 60 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. RCBच्या नवदीप सैनीनं ( Navdeep Saini) टिच्चून मारा करताना MIला 7 धावांवर रोखले आणि विराट कोहली व एबी यांनी हे लक्ष्य पार करून RCBला विजय मिळवून दिला.

7 / 13

99 धावांवर माघारी परतलेल्या इशानचे कौतुक करताना त्याच्या कथित गर्लफ्रेंड अदिती हुंडाई हीनं इस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहिली. त्यात इशान बाद होऊन माघारी जाताना दिसत आहे आणि त्यावर तिनं लिहिलं की,''मला तुझा अभिमान वाटतो बेबी.''

8 / 13

आदिती हुंडाई 2017च्या मिस इंडिया स्पर्धेतील फायनलिस्ट आहे. 2018मध्ये तिनं मिस सुपरनॅच्युरल इंडिया हा पुरस्कार जिंकला आहे. इशानसोबत तिच्या अफेअरची चर्चा सुरू आहे.

9 / 13

10 / 13

11 / 13

12 / 13

13 / 13

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर