Join us

रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 20:04 IST

Open in App
1 / 10

भारतीय क्रिकेट संघाचा फिनिशर रिंकु सिंह पुन्हा एकदा चर्चेत आलाय.रिंकू सिंह या महिन्यातच म्हणजेच जूनमध्ये लग्न करणार असल्याचे समोर आले.

2 / 10

रिंकु सिंहचा साखरपुडा ८ जून रोजी मच्छलीशहरच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत होणार आहे. तर त्यांचा विवाह १८ जून रोजी होणार असल्याचे समोर आले.

3 / 10

सद्या सोशल मीडियावर या लग्नाची चर्चेसह दोघांच्या कमाईच्या चर्चा सुरू आहेत. दोघांच्यामध्ये रिंकू सिंह कमाईमध्ये पुढे आहे. दोघांच्याही निव्वळ संपत्तीत खूप फरक आहे.

4 / 10

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या लग्नाची तारीख १८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये क्रिकेटपटू रिंकू सिंहचे समाजवादी पक्षाच्या खासदर प्रिया सरोज यांचे लग्न ठरले आहे.

5 / 10

प्रिया सरोज वेळा खासदार राहिल्या आहेत, त्या केराकत मतदारसंघातील सपा आमदार तूफानी सरोज यांच्या मुलगी आहेत. २३ नोव्हेंबर १९९८ रोजी वाराणसी येथे जन्मलेल्या २६ वर्षीय प्रिया सरोज यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला.

6 / 10

त्यांनी बीपी सरोज यांचा ३५८५० मतांनी पराभव केला. निवडणुकीदरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या मालमत्तेचा खुलासा केला होता.

7 / 10

प्रिया सरोज यांनी नोएडातील अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीमधून एलएलबी पदवी मिळवली. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, एकूण मालमत्ता ११,२५,७१९ रुपये आहे आणि त्यातील मोठा भाग त्यांच्या बँक ठेवींचा आहे. त्यांच्या युनियन बँक खात्यात १०,१०,००० रुपये ठेव आहेत.

8 / 10

याशिवाय, निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे सुमारे ३२,००० रुपये किमतीचे फक्त ५ ग्रॅम सोने होते. याशिवाय, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी सांगितले होते की त्यांच्या नावावर ना घर आहे ना त्यांच्याकडे कोणतीही कार नोंदणीकृत आहे.

9 / 10

रिंकू सिंहची एकूण संपत्ती सुमारे ७ ते ८ कोटी रुपये आहे. बीसीसीआय ग्रेड-सी कॉन्ट्रॅक्ट खेळाडू रिंकू सिंहला दरवर्षी येथून सुमारे ६०-७० लाख रुपये पगार मिळतो. आयपीएल २०२५ मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्सने १३ कोटी रुपयांना कायम ठेवले होते. त्यानुसार, मालमत्तेच्या बाबतीत तो पत्नी प्रिया सरोजपेक्षा श्रीमंत आहे.

10 / 10

अलिगडमधील त्याच्या घराची किंमत सुमारे ३ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :रिंकू सिंगऑफ द फिल्ड