कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनंही गुरुवारी आयपीएल स्पर्धा पुढील सूचनेपर्यंत स्थगित केल्याचे जाहीर केले.
याआधी पाकिस्तान सुपर लीग ट्वेंटी-20 स्पर्धा रद्द करावी लागली. या लीगचे केवळ तीन सामने शिल्लक होते.
इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल याच्यात कोरोनाची लक्षणं आढळल्यानं हा निर्णय घ्यावा लागला.
हेलनं पहाटे दोन वाजता फोन करून कोरोनाची लक्षणं असल्याची माहिती दिली. त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे, कराची किंग्स संघाचे मालक सलमान इक्बाल यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की,''रात्री दोन वाजता मला अॅलेक्स हेलचा मॅसेज आला. त्यानं लिहीलं की, बॉस माझ्यात कोरोनाची लक्षणं दिसत आहेत. तुम्हाला सर्वांची तपासणी करायला हवी. त्यानंतर मला प्रशिक्षक डिन जोन्स यांचा कॉल आला आणि त्यांनी त्वरित भेटायला सांगितले.